Join us  

IND vs AUS 3rd Test : अरेरे, ऑस्ट्रेलियाची ही अवस्था पाहवत नाही, 2018मध्ये प्रतिस्पर्धीच सरस

IND vs AUS 3rd Test: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 11:19 AM

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. भारताचे 399 धावांचे लक्ष्य कांगारूंना पेलवत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत आघाडी घेणार हे निश्चित झाले आहे. भारतीय संघ 2018 या वर्षांचा शेवट विजयाने करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, 2018 हे वर्ष ऑस्ट्रेलियासाठी अपयशाचे वर्ष राहिले आहे. 2014 नंतर ऑस्ट्रेलियाच्या संघावर शतकांच्या बाबतित प्रथमच प्रतिस्पर्धी हावी झालेले पाहायला मिळाले आहेत.

बॉक्सिंग डे कसोटीपूर्वीच्या 9 सामन्यांत केवळ तीनच विजय मिळवता आले आहेत. पाच सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला, तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. भारताच्या 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची तारांबळ उडाली आहे. त्यांचे सहा फलंदाज 157 धावांवर माघारी परतले आहेत आणि विजयासाठी त्यांना आणखी 242 धावा करायच्या आहेत. भारत विजयाच्या उंबरठ्यावर आला असून दूसऱ्या डावात आतापर्यंत जसप्रीत बुमरा आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत.

शतकांच्या बाबतीत सरते वर्ष ऑस्ट्रेलियासाठी निराशाजनक राहिले आहे. दहा कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून केवळ चारच शतकं झाली आहेत, त्याउलट प्रतिस्पर्धींनी दहा शतकं ठोकली आहेत. 2014 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या शतकांचा आकडा हा प्रतिस्पर्धींपेक्षा कमी राहिला आहे. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलिया