Join us

IND vs AUS 3rd T20 : कृणाल पंड्याच्या नावावर नवा विक्रम

जर रोहित शर्माने कृणालच्या गोलंदाजीवरील झेल टीपला असता तर त्याचे बळीपंचक पूर्ण होऊ शकले असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 15:52 IST

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने एक नवा विक्रम रचला आहे. या सामन्यात कृणालने चार बळी मिळवले. पण जर रोहित शर्माने कृणालच्या गोलंदाजीवरील झेल टीपला असता तर त्याचे बळीपंचक पूर्ण होऊ शकले असते.

कृणालने चांगला मारा करत ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना माघारी धाडले. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर एका फिरकीपटूने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचे म्हटले जात आहे.

... तर कृणालचे बळी पंचक झाले असतेकृणाल पंड्याच्या आठव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ही गोष्ट घडली. पंड्याच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच मोठा फटका मारायला सरसावला. त्यावेळी फिंचचा फटका चुकला. फिंचने टोलावलेला चेंडू उंच उडाला. यावेळी रोहित हा झेल पकडण्यासाठी धावत आला. रोहित बरोबर चेंडूच्या खाली आला. आता रोहित झेल पकडणार असे वाटत होते. पण रोहितने बॉलवरची नजर हटवली आणि चेंडू त्याच्या हातातून निसटला. रोहितने झेल सोडला तेव्हा फिंच 22 धावांवर होता. पण यानंतर फिंचला मोठी खेळी साकारता आली नाही. फिंचला 28 धावांवर असताना कुलदीप यादवने बाद केले.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया