IND vs AUS T20 2022 Live : रोहित शर्माने परंपरा मोडली! विजयाची ट्रॉफी युवा खेळाडूकडे नाही दिली, पाहा काय घडलं, Video 

IND vs AUS T20 2022 Live Match - भारताने ०-१ अशा पिछाडीवरून ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 11:50 PM2022-09-25T23:50:26+5:302022-09-25T23:50:54+5:30

whatsapp join usJoin us
ind vs aus 3rd t20 Int Live Scorecard Live Streaming : That moment when Team India Captain Rohit Sharma received the T20I series trophy, Trophy handed over to Dinesh Karthik Video   | IND vs AUS T20 2022 Live : रोहित शर्माने परंपरा मोडली! विजयाची ट्रॉफी युवा खेळाडूकडे नाही दिली, पाहा काय घडलं, Video 

IND vs AUS T20 2022 Live : रोहित शर्माने परंपरा मोडली! विजयाची ट्रॉफी युवा खेळाडूकडे नाही दिली, पाहा काय घडलं, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS T20 2022 Live Match - भारताने ०-१ अशा पिछाडीवरून ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली. रोहित शर्माने  ( Rohit Sharma) पूर्णवेळ कर्णधारपद हाती घेतल्यानंतर भारताचा हा नववा मालिका विजय ठरला. कॅलेंडर वर्षातील भारताने २१ वा ट्वेंटी-२० विजय मिळवून पाकिस्तानचा सर्वाधिक २० विजयांचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाच्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली ( Virat Kohli) व सूर्यकुमार यादव ( surayakumar yadav) यांच्या १०४ धावांची भागीदारी करून भारताचा विजय पक्का केला आणि हार्दिक पांड्याने सामना संपवला. या विजयानंतर रोहितला BCCIचे खजिनदार अरुण सिंग यांच्याकडून विजयी चषक दिला गेला. परंपरेनुसार रोहितने ही ट्रॉफी युवा खेळाडूकडे सोपवणे अपेक्षित होते, पंरतु त्याने तसे नाही केले.

सर्वोत्तम क्षण! विजयी धाव सोडा, विराट कोहली- रोहित शर्मा यांचा 'तो' तुफान Viral झालेला Video पाहा

पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहितचे मालिका विजय

  • वि. वि. न्यूझीलंड ३-० ट्वेंटी-२०
  • वि. वि. वेस्ट इंडिज ३-० वन डे
  • वि. वि. वेस्ट इंडिज ३-० ट्वेंटी-२०
  • वि. वि. श्रीलंका ३-० ट्वेंटी-२०
  • वि. वि. श्रीलंका २-० कसोटी
  • वि. वि. इंग्लंड २-१ ट्वेंटी-२०
  • वि. वि. इंग्लंड २-१ वन डे
  • वि. वि. वेस्ट इंडिज ३-१ ट्वेंटी-२०

कॅमेरून ग्रीनचा ( Cameron Green) तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल ( Axar Patel)  व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यात ग्लेन मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell) विकेटने सामन्यात थोडासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने ( Tim David) भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले आणि तगडे आव्हान उभे केले. कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा चोपल्या.  टीम डेव्हिड २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. सॅम्स २८ धावांवर नाबाद राहिला. भुवीने ३ षटकांत ३९ ( १ विकेट) धावा, जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. अक्षरने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनेही २२ धावांत १ विकेट घेतली. 

२४ तासांत भारताकडून दुसरा वादग्रस्त रन आऊट, कार्तिकच्या ग्लोव्ह्जला लागून बेल्स उडाली अन् वाद

लोकेश राहुल ( १) व रोहित शर्मा ( १७ ) माघारी परतले. सूर्यकुमार व विराट यांनी १०४ धावांची भागीदारी करून डाव सावरला. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ६९ धावांवर झेलबाद झाला. विराटने ४८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावा करून आपलं काम केलं. हार्दिक १६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराटच्या २४०७८ धावा झाल्या असून त्याने राहुल द्रविडचा ( २४०६४ ) विक्रम मोडला. सचिन तेंडुलकर ३४३५७ धावांसह आघाडीवर आहे. रोहितने विजयी ट्रॉफी संघातील सीनियर खेळाडू दिनेश कार्तिककडे सोपवली. 
 

 

Web Title: ind vs aus 3rd t20 Int Live Scorecard Live Streaming : That moment when Team India Captain Rohit Sharma received the T20I series trophy, Trophy handed over to Dinesh Karthik Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.