IND vs AUS T20 2022 Live : सर्वोत्तम क्षण! विजयी धाव सोडा, विराट कोहली- रोहित शर्मा यांचा 'तो' तुफान Viral झालेला Video पाहा

IND vs AUS T20 2022 Live Match - भारताने ०-१ अशा पिछाडीवरून ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली. रोहित शर्माने  ( Rohit Sharma) पूर्णवेळ कर्णधारपद हाती घेतल्यानंतर भारताचा हा नववा मालिका विजय ठरला. कॅलेंडर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 11:18 PM2022-09-25T23:18:56+5:302022-09-25T23:19:35+5:30

whatsapp join usJoin us
ind vs aus 3rd t20 Int Live Scorecard Live Streaming : Best Moments! The winning celebration from Rohit Sharma and Virat Kohli was wholesome, Video  | IND vs AUS T20 2022 Live : सर्वोत्तम क्षण! विजयी धाव सोडा, विराट कोहली- रोहित शर्मा यांचा 'तो' तुफान Viral झालेला Video पाहा

IND vs AUS T20 2022 Live : सर्वोत्तम क्षण! विजयी धाव सोडा, विराट कोहली- रोहित शर्मा यांचा 'तो' तुफान Viral झालेला Video पाहा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS T20 2022 Live Match - भारताने ०-१ अशा पिछाडीवरून ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली. रोहित शर्माने  ( Rohit Sharma) पूर्णवेळ कर्णधारपद हाती घेतल्यानंतर भारताचा हा नववा मालिका विजय ठरला. कॅलेंडर वर्षातील भारताने २१ वा ट्वेंटी-२० विजय मिळवून पाकिस्तानचा सर्वाधिक २० विजयांचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाच्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली ( Virat Kohli) व सूर्यकुमार यादव ( surayakumar yadav) यांच्या १०४ धावांची भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला.  

Virat Kohli ने राहुल द्रविडला टाकले मागे, मोडला मोठा विक्रम; Rohit Sharma नेही थोपटली पाठ, Video 

लोकेश राहुल ( १) व रहित शर्मा ( १७ ) माघारी परतले. सूर्यकुमार व विराट यांनी १०४ धावांची भागीदारी करून डाव सावरला. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ६९ धावांवर झेलबाद झाला. विराटने ४८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावा करून आपलं काम केलं. हार्दिक १६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराटच्या २४०७८ धावा झाल्या असून त्याने राहुल द्रविडचा ( २४०६४ ) विक्रम मोडला. सचिन तेंडुलकर ३४३५७ धावांसह आघाडीवर आहे.  



 

कॅमेरून ग्रीनचा ( Cameron Green) तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल ( Axar Patel)  व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले. अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने ( Tim David) भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले आणि तगडे आव्हान उभे केले. कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा चोपल्या.  टीम डेव्हिड २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. सॅम्स २८ धावांवर नाबाद राहिला. भुवीने ३ षटकांत ३९ ( १ विकेट) धावा, जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. अक्षरने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनेही २२ धावांत १ विकेट घेतली. 

Web Title: ind vs aus 3rd t20 Int Live Scorecard Live Streaming : Best Moments! The winning celebration from Rohit Sharma and Virat Kohli was wholesome, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.