Join us

IND vs AUS 3rd T20 : गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारताला फटका, ऑस्ट्रेलियाचे 165 धावांचे आव्हान

तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना 164 धावा करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 15:06 IST

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला असला तरी गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका भारताला बसला. त्यामुळे तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना 164 धावा करता आल्या.

ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला रोहित शर्माने 22 धावांवर असताना जीवदान दिले. पण त्यानंतर फक्त सहा धावाच फिंचला करता आल्या. रोहितबरोबर लोकेश राहुल, जसप्रीत बुमरा, रिषभ पंत यांनाही दर्जेदार क्षेत्ररक्षण करता आले नाही.

 

फिंच बाद झाल्यावर ठराविक फरकाने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होत राहिले. मोठी भागीदारी रचणे किंवा मोठे फटके मारणे त्यांना जमले नाही. पण अखेरच्या काही षटकांत त्यांनी धावांचा वेग वाढला आणि त्यांना अखेर 164 धावा करता आल्या. भारताकडून कृणाल पंड्याने यावेळी चार बळी मिळवले.

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माअ‍ॅरॉन फिंच