IND vs AUS 3rd ODI Virat Kohli With A Cheeky Celebration After Scoring His First Run : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यात भोपळा पदरी पडलेल्या विराट कोहलीनं तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात अखेर खातं उघडलं. या मालिकेतील पहिली धाव काढल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्याजोगा होता. एवढेच नाही तर खातं उघडल्यावर त्यानं सेलिब्रेशनही केल्याचे दिसून आले. सिडनीच्या मैदानातील हा खास क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कारकिर्दीत पहिल्यांदा ओढावली बॅक टू बॅक शून्यावर आउट होण्याची नामुष्की
आपल्या मोठ्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदाच विराट कोहलीवर सलग दोन सामन्यात शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ही मालिका किंग कोहलीसाठी खास आहे. कारण कदाचित पुन्हा तो या मैदानात खेळताना दिसणार नाही. दोन सामन्यातील अपयशानंतर अखेर त्याने खाते उघडले. झिरोचं ग्रहण लागल्यावर कोणत्याही खेळाडूसाठी यातून बाहेर पडणं एक मोठी गोष्ट ठरते. कोहलीही त्याला अपवाद नाही. तेच चित्र सिडनीच्या मैदानात त्याने मालिकेतील पहिली धाव काढल्यावर पाहायला मिळाले.
IND vs AUS : हिटमॅन रोहितचं 'शतक'! फिल्डिंग लावून ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा केला 'करेक्ट कार्यक्रम'
किंग कोहलीनं खातं उघडताच चाहत्यांनीही केला एकच कल्ला
ऑस्ट्रेलियन मैदानात कोहलीसाठी हा शेवटचा सामना ठरेल, ही गोष्ट लक्षात ठेवून त्याची झलक पाहण्यासाठी सिडनीच्या स्टेडियमवर त्याच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याचेही दिसून आले. किंग कोहलीनं आपलं खातं उघडल्यावर प्रेक्षकांनीही एकच कल्ला केला. विराट कोहलीनंही या धावेसह सुटकेचा निश्वास टाकत शून्याचं ग्रहण सुटल्याचा आनंद व्यक्त केला.
पहिल्या दोन सामन्यात १२ चेंडू खेळला, पण खातं नाही उघडलं
पर्थच्या मैदानातील पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीनं ८ चेंडूचा सामना केला, पण त्याला खातंही उघडता आलं नव्हतं. ॲडलेडच्या मैदानातही तेच चित्र दिसलं. दुसऱ्या सामन्यात विराट कोहली ४ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला होता. ॲडलेडच्या मैदानातील दुसऱ्या सामन्यात भोपळा पदरी पडल्यावर विराट कोहलीनं चाहत्यांना ग्लोव्ह्ज दाखवत या मैदानातील शेवटचा डाव खेळल्याचे संकेत दिले होते. सिडनीच्या मैदानात खातं उघडूनं कोहलीनं शेवटचा डाव अविस्मरणी करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकल्याचे पाहायला मिळाले.