IND vs AUS 3rd ODI Rohit Sharma Set One More Record Against Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या भात्यातून सलग दुसरे अर्धशतक पाहायला मिळाले. वनडे कारकिर्दीतील ६० व्या अर्धशतकासह रोहित शर्मानं आणखी एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. सिडनीच्या मैदानात रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेत २५०० धावांचा टप्पा पार केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलिविरुद्धच्या वनडेत भारताकडून हा पल्ला गाठणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलग दोन सामन्यातील दमदार खेळीसह विक्रमांची 'बरसात'
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यात २५०० धावांचा पल्ला गाठत खास विक्रम नोंदवणाऱ्या रोहित शर्मानं ॲडलेड येथील ओव्हलच्या मैदानातही रोहित शर्मानं मोठा पराक्रम करून दाखवला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील याआधीच्या अर्धशतकी खेळीत त्याने ऑस्ट्रेलियन मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत १००० धावा करण्याचा डाव साधला होता. अशी कागमरी करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर वनडे कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात होते. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील बॅक टू बॅक दमदार खेळीसह त्याने आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची आस कायम असल्याची खेळी करून दाखवली आहे.
त्याच्या पाठोपाठ विराट कोहलीनंही पार केला २५०० धावसंख्येचा आकडा
रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनं सिडनीच्या मैदानात अर्धशतकी खेळी साकारली. दोन सामन्यातील फ्लॉपशोनंतर केलेल्या या कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीनंही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत २५०० धावांचा आकडा गाठला आहे. सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मापाठोपाठ या यादीत विराट कोहली तिसरा भारतीय आहे ज्याने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या वनडेत २५०० धावांचा पल्ला पार केला आहे.