IND vs AUS, 3rd ODI, Mohammed Siraj Gets Wicket Of Travis Head : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना सिडनीच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅविस हेडनं कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना रिमांडवर घेतल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान मोठा विक्रमी डावही साधला. पण सिराजला बॅक टू बॅक मोठा फटका मारण्याचा नाद केला अन् वाया गेला. एक खणखणीत चौकार मारल्यावर मोहम्मद सिराजनं एका अप्रतिम चेंडूवर ट्रॅविसह हेडला आपल्या जाळ्यात अडकवले. प्रसिद्ध कृष्णा याने त्याला झेलबाद केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ट्रेविस हेडनं मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
सिडनीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ट्रॅविस हेडनं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. स्टिव्ह स्मिथला मागे टाकत त्याने ऑस्ट्रेलियाकडून वनडेत सर्वात जलद ३००० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. स्मिथनं ७९ डावात हा पल्ला गाठला होता. ट्रॅविस हेडनं ७६ व्या डावात ही कामगिरी नोंदवली. विक्रमी कामगिरीनंतर तो टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरेल, असे चित्र निर्माण झाले होते. पण मोहम्मद सिराजवर तुटून पडण्याचा त्याचा डाव फसला अन् २९ धावा करून तो तंबूत परतला.
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
सिराजसमोर तो पुन्हा ठरला फिका
वनडेत मोहम्मद सिराज आणि ट्रॅविस हेड ७ वेळा समोरासमोर आले आहेत. यात मोहम्मद सिराजनं ३ वेळा त्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे. सिराजसमोर ८१ चेंडूचा सामना कताना हेडनं ३७ च्या सरासरीनं फक्त १३७ धावा केल्या आहेत. ही आकडेवारी ऑस्ट्रेलियन स्फोटक बॅटरसमोर सिराज भारी ठरल्याचा पुरावाच आहे.
सिराजवर तुटून पडण्याचा नादात शेवटी फसलाच
सिडनीच्या मैदानातील सामन्यात ट्रॅविस हेडनं डावातील तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सिराजच्या गोलंदाजीवरच सामन्यातील पहिला चौकार मारला. सिराज घेऊन आलेल्या पाचव्या षटकात त्याने सिराजसमोर तोरा दाखवताना दोन चौकार मारले. दहाव्या षटकात चौकार मारत त्याने सिराजचं स्वागत केले. पण मग भारतीय गोलंदाजानं पलटवार करत पुढच्या चेंडूवर त्याचा करेक्ट कार्यक्रम करत बदला घेतला.