Join us  

मिचेल 'हार्श'! १९ चेंडूंत ७० धावा; ऑस्ट्रेलियन फलंदाजाने बेक्कार चोपले, शतक ४ धावांनी हुकले

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi :  सपाट खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आज मनसोक्त फटकेबाजीचा आनंद लुटला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 3:38 PM

Open in App

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi :  सपाट खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आज मनसोक्त फटकेबाजीचा आनंद लुटला. डेव्हिड वॉर्नरने खणखणीत षटकार अन् मिचेल मार्शचा प्रहार पाहून भारतीय चाहते टेंशनमध्ये आले. वॉर्नर स्वतःच्या चुकीने बाद झाला, परंतु मार्शचा 'हार्श' मारा कायम राहिला. स्टीव्ह स्मिथसोबत त्याने शतकी भागीदारी करून ऑसींना २५ षटकांत २०० पार धावा उभारून दिल्या. लाईव्ह स्कोअरबोर्डसाठी

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मिचेल मार्शने तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहला अन् डेव्हिड वॉर्नरने पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजला खेचलेले षटकार पाहण्यासारखे होते.प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच षटकात वॉर्नरने १९ धावा कुटल्या, परंतु पुढच्या षटकात कृष्णाला स्कूप मारण्याच्या प्रयत्नात वॉर्नर यष्टिरक्षकाच्या हाती झेलबाद झाला. डेव्हिड वॉर्नरने ३४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५६ धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाला ७८ धावांवर पहिला धक्का बसला.  मार्श व स्टीव्ह स्मिथ यांनी फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर दणदणीत फटकेबाजी केली. जसप्रीतच्या दोन षटकांत प्रत्येकी १९-१९ धावा कुटल्या गेल्या.

समालोचक रवी शास्त्री यांनी रायपूरच्या खेळपट्टीचा उल्लेख हाय वे असा केला... गोलंदाजांना इथे काहीच मदत मिळत नव्हती आणि ऑसी फलंदाजांनी २६व्या षटकातच फलकावर २०० धावा चढवल्या. मार्श आणि स्मिथ यांची ११८ चेंडूंवरील १३७ धावांची भागीदारी कुलदीप यादवने तोडली. मार्श  ८४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९६ धावांवर कव्हरला कृष्णाच्या हाती झेल देऊन परतला. भारतातील मागील ९ वन डे सामन्यांत मार्शने ७६.३३च्या सरासरीने ४५८ धावा कुटल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नर