IND vs AUS 3rd ODI Harshit Rana Took Wicket After Rohit Sharma Brief Discussion And Changed Field Position : सिडनीच्या मैदानात रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचा अनुभव टीम इंडियाच्या कामी आल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडियाचा नवा कर्णधार शुबमन गिल याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली वेळोवेळी मदत करताना दिसले.
रोहितनं फिल्डिंग लावली अन् हर्षित राणानं पुढच्या चेंडूवरच साधला विकेटचा डाव
ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३८ व्या षटकात माजी कर्णधार रोहित शर्मा गोलंदाजीला आलेल्या हर्षित राणासोबत चर्चा करताना स्पॉट झाले. एवढेच नाही तर रोहितनं मिचेल ओव्हनसाठी फिल्डिंग लावली आणि राणाच्या खात्यात त्याची विकेट जमा झाली. रोहित शर्मानंच स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला. मिचेल ओव्हन ४ चेंडूत अवघ्या एका धावेची भर घालून तंबूत परतला. सिडनीच्या मैदानातील रोहितचा गेम प्लॅन आणि त्यानंतर हर्षित राणानं साधलेला विकेचा डाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
हिटमॅन रोहितनं बॅटिंगला येण्याआधी झळकावले खास 'शतक'
सिडनीच्या वनडेत रोहित शर्मानं हर्षित राणाच्या गोलंजाजीवर मिचेल ओव्हनचा पहिला झेट टिपला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर त्याने या सामन्यात आणखी एक झेल टिपला. यासह वनडेत त्याने भारताकडन १०० झेल टिपण्याचा खास पल्ला गाठला. भारताकडून वनडेत शंभर झेल घेणारा तो सहावा खेळाडू ठरला. या यादीत विराट कोहली सर्वात आघाडीवर आहे.
भारतासाठी १००+ कॅचेस घेतलेले खेळाडू (ODI)
| खेळाडू | कॅचेस (ODI) |
|---|
| विराट कोहली | १६५ |
| मोहम्मद अझहरुद्दीन | १५६ |
| सचिन तेंडुलकर | १४० |
| राहुल द्रविड़ | १२४ |
| सुरेश रैना | १०२ |
| रोहित शर्मा | १००* |