Join us

IND vs AUS 2nd Test: पंतच्या हॅल्मेटला लागला चेंडू आणि रहाणेने पकडली कॅच, पाहा हा व्हिडीओ...

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीचा 'स्पाइडरमॅन कॅच' चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 16:49 IST

Open in App

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीचा 'स्पाइडरमॅन कॅच' चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. पण पहिल्याच दिवशी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेगी एक अफलातून झेल टिपला आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरिस दमदार फलंदाजी करत होता. भारताच्या गोलंदाजीचा त्याने चांगलाच समाचार घेतला होता. कोहलीने सर्व गोलंदाजांना संधी दिली, पण त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर त्याने अष्टपैलू हनुमा विहारीच्या हाती चेंडू सुपूर्द केला. विहारीचा एक उसळता चेंडू हॅरिसच्या दिशेने आला. हॅरिस या चेंडूवर फसला आणि चेंडूने त्याची बॅटची कडा घेतली. त्यानंतर चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हॅल्मेटला लागला. पण स्लीपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्यने हा चेंडू अप्रतिमपणे टिपला.

पाहा अजिंक्य रहाणेने पकडलेला अप्रतिम झेल

कोहलीची 'स्पाइडरमॅन कॅच' पाहा

टॅग्स :अजिंक्य रहाणेरिषभ पंत