पर्थः ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून पर्थच्या मैदानावर खेळली जात आहे. या मालिकेत भारत 1-0नं आघाडीवर आहे. हिरव्यागार खेळपट्टीवर यजमानांची पुन्हा ‘विकेट’ काढण्याच्या निर्धारानेच टीम इंडिया मैदानावर उतरली आहे. उपाहाराच्या खेळापर्यंत ऑस्ट्रेलियानं बिनबाद 66 धावा केल्या आहेत. हा सामना पर्थमधल्या नवनिर्मित ऑप्टस स्टेडियमवर सुरू आहे. ऑप्टस स्टेडियम हे टेस्ट क्रिकेटचं 117वं मैदान आहे. हे ऑस्ट्रेलियाचं 10वं टेस्ट क्रिकेट स्टेडियम असून, पर्थमधल्या वाकानंतर हे दुसरं स्टेडियम आहे.
LIVE
Get Latest Updates
03:30 PM
पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला ७ बाद 277
03:28 PM
ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, ट्रेव्हिस हेड आऊट
02:53 PM
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, पीटर हँड्सकॉम्ब आऊट
12:44 PM
दुसऱ्या सत्रात भारताने पटकावले तीन बळी, ऑस्ट्रेलिया ३ बाद १४५
12:15 PM
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, अर्धशतकवीर हॅरिस बाद
12:06 PM
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, उस्मान ख्वाजा आऊट
11:41 AM
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, बुमराच्या चेंडूवर फिंच बाद
10:22 AM
ऑस्ट्रेलियाच्या उपाहारापर्यंत नाबाद 66 धावा
08:14 AM
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय