Join us

IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीचा मोठा खुलासा; म्हणून रवींद्र जडेजाला खेळवले नाही

IND vs AUS 2nd Test: पहिल्या कसोटीत विजय मिळवत आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाला पर्थवर हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 09:41 IST

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाला पर्थवर हार पत्करावी लागली.ऑस्ट्रेलियाच्या विजयात नॅथन लियॉनचा सिंहाचा वाटारवींद्र जडेजाची उणीव जाणवली

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया :  पहिल्या कसोटीत विजय मिळवत आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाला पर्थवर हार पत्करावी लागली. ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करताना दुसऱ्या कसोटीत 146 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. ऑस्ट्रेलियाच्या विजयात फिरकीपटून नॅथन लियॉनने सिंहाचा वाटा उचलला. त्याने दोन्ही डावांत मिळून 8 विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीनंतर भारतीय संघात रवींद्र जडेजाची उणीव प्रकर्षाने जाणवली. स्पेशालिस्ट स्पिनर म्हणून तो संघात असता तर चित्र वेगळे असते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जडेजाला का खेळवले नाही, याबाबत कर्णधार विराट कोहलीने मोठा खुलासा केला. पराभवानंतर कोहली म्हणाला,''खेळपट्टी पाहल्यानंतर या कसोटीत जडेजाला खेळवावे, असे आम्हाला नाही वाटले. नॅथन लियॉनने अप्रतिम गोलंदाजी केली. स्पेशालिस्ट फिरकीपटू खेळवावा असा विचार आम्ही केला नव्हता. चार जलदगती गोलंदाज सामना जिंकून देण्यासाठी पुरेसे आहेत, असे आम्हाला वाटले.''या सामन्यात भारताने अतिरिक्त जलदगती गोलंदाज म्हणून उमेश यादवला संधी दिली. त्याने दोन्ही डावांत मिळून 139 धावांत 2 विकेट घेतल्या. त्याउलट ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू लियॉनने 106 धावा देत 8 विकेट टिपल्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय