Join us

IND vs AUS 2nd Test : विराट कोहली असा काढतोय चुकीचा बाद दिल्याचा राग 

IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला रागावर संयम राखता येत नसल्याचे दुसऱ्या कसोटीत दिसून आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 14:06 IST

Open in App

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला रागावर संयम राखता येत नसल्याचे दुसऱ्या कसोटीत दिसून आले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कोहलीने शतक झळकावून भारताची आघाडीच्या दिशेने वाटचाल करून दिली. पण, वैयक्तिक 123 धावांवर असताना पंचांनी कोहलीला झेलबाद दिले. पीटर हॅण्ड्सकोम्बच्या हातात जाण्यापूर्वी चेंडूने जमिनीचे चुंबन घेतल्याचे स्पष्ट दिसत असतानाही पंचांनी कोहलीला बाद ठरवले. DRS नंतरही चौथ्या पंचांनी निर्णय कायम राखल्याने कोहली संतापला आणि रागातच त्याने मैदान सोडले. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याने चांगलाच राग काढला.पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगालच समाचार घेतला. त्याची ही खेळी 123 धावांवर संपुष्टात आली. कोहलीने 257 चेंडूंत 13 चौकार व 1 षटकार खेचून 123 धावा केल्या. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 93व्या षटकात पीटर हॅण्ड्सकोम्बने झेल टिपून कोहलीची खेळी संपुष्टात आणली. मात्र, हॅण्ड्सकोम्बने टिपलेला तो झेल वादात अडकला आहे. पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय