Join us

IND vs AUS 2nd Test: मैदानात घुसणाऱ्या चाहत्याला गार्डने मारले; शमीने केलेल्या कृतीने सर्वांचे मन जिंकले, पाहा Video

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:45 IST

Open in App

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळाला होता. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

दिल्ली कसोटीचा पहिला दिवस संतुलित राहिला. आर अश्विनन एका षटकात दोन धक्के देऊन भारताला कमबॅक करून दिले होते. पण, उस्मान ख्वाजाने ( Usman Khwaja) एकहाती खिंड लढवताना भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. त्याचे शतक हुकल्यानंतर पीटर हँड्सकोम्ब व पॅट कमिन्स यांनी ऑस्ट्रेलियाला सावरले.

'हिंदी समज गया वो...'; कोहली अन् अश्विनचे डावपेच ख्वाजाने ओळखले, दोघे हसून लाल झाले, Video

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सन्मानजनक धावसंख्या उभी केली. मात्र ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आले. हँड्सकोम्ब ७२ धावांवर नाबाद राहिला. शमीने चार, तर अश्विन व जडेजा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताने दिवसअखेर २१ धावा केल्या असून एकही विकेट गमावलेली नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरू आहे. या दरम्यान दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ सुरु असताना एक चाहता भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी मैदानात घुसला पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान सीमारेषेवर उभ्या असलेल्या मोहम्मद शमीने गार्डला तसे न करण्यास सांगितले आणि चाहत्याला सोडून देण्यास सांगितले.

रवींद्र जडेजाचे २५० बळी पूर्ण 

भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटीमध्ये २५० बळी घेण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. त्याने उस्मान ख्वाजाला ८१ धावांवर तंबूत पाठवले आणि ही किमया साधली. भारतीय सलामीवीर लोकेश राहुलने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे ख्वाजाला आपल्या शतकाला मुकावे लागले. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर मोहम्मद शमी (२) आणि रवींद्र जडेजाला (१) बळी घेण्यात यश आले. लक्षणीय बाब म्हणजे रविचंद्रन अश्विनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात १०० बळी पूर्ण केले. अशी किमया साधणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद शामीसोशल व्हायरल
Open in App