Join us

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, फिंचने मैदान सोडलं

IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 13:19 IST

Open in App

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मोठा धक्का बसला आहे. त्यांचा सलामीवीर आरोन फिंचला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. बोटाला दुखापत झाल्याने तो उपहारानंतर मैदानावर परतलाच नाही. त्याच्या जागी उस्मान ख्वाजा फलंदाजीला आला. बोटाचा एक्स रे काढल्यानंतर त्याची दुखापत किती गंभीर आहे याचा अंदाज येईल. 

भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या 13 व्या षटकात फिंचच्या बोटाला दुखापत झाली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 33 धावा झाल्या होत्या आणि यजमानांकडे 76 धावांची आघाडी होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 326 धावांच्या उत्तरात भारताचा पहिला डाव 283 धावांवर गडगडला. बोटावर चेंडू आदळल्यानंतर फिंचने त्वरीत ग्लोज काढून डॉक्टरांना बोलावले.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय