Join us

IND vs AUS 2nd T20: विराट कोहली अंपायरवर भडकला, भर मैदानात घातला वाद

IND vs AUS 2nd T20: 19 व्या षटकात कोहलीने भर मैदानात अंपायरशी वाद घातला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 15:09 IST

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ त्यांनी 62 धावांवर माघारी पाठवला. सामन्याच्या सुरुवातीला पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा आला होता आणि त्यामुळे कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. मात्र, 19व्या षटकात पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबवण्यात आला. पण, 19 व्या षटकात कोहलीने भर मैदानात अंपायरशी वाद घातला..भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात कांगारूंचा कर्णधार अॅरोन फिंचला माघारी पाठवले. त्यानंतर डावखुरा जलदगती गोलंदाज खलील अहमदने त्याचा करिष्मा दाखवला. त्याने एका षटकाच्या अंतराने ख्रिस लीन आणि डी'अॅर्सी शॉर्टला बाद केले. तत्पूर्वी या दोघांनाही जीवदान मिळाले होते. जसप्रीत बुमराने मार्कस स्टोईनिसला बाद केले. जलदगती गोलंदाजांच्या प्रभावानंतर फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ अवघ्या 62 धावांवर माघारी परतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला धक्के बसत राहिले. 19 षटकांत त्यांच्या 7 बाद 132 धावा झाल्या होत्या.जसप्रीत बुमरा 19वे षटक टाकत होता. दुसरा चेंडू टाकल्यानंतर पावसाचे आगमन झाले आणि प्रेक्षक स्टेडियमबाहेर जाऊ लागले. बुमराने अंपायरकडे सामना थांबवण्याबाबत विचारणा केली, परंतु त्यांनी दाद दिली नाही. त्यानंतर कोहली अंपायरकडे धावत आला आणि कारण विचारू लागला. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली