Rohit Sharma Fifty Becomes First Asian Batter To Complete 150 Sixes In SENA Country : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं आपल्या आक्रमक शैलीच्या अगदी विपरित खेळ करत संघासाठी उपयुक्त खेळी साकारली. त्याने संयमी खेळीचा नजराणा पेश करत पहिल्या एकदिवसीय सामन्यातील कसर भरून काढताना एकदिवसीय क्रिकेटमधील ५९ वे अर्धशतक साजरे केले. २०१५ नंतर त्याच्या भात्यातून आलेली ही सर्वात धीम्यागतीनं केलेले अर्धशतक ठरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिचेल स्टार्कनं रोहितच्या खेळीला लावला ब्रेक
२०२२ पासून रोहित शर्मानं आतापर्यंत ५० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या १९ खेळी केल्या आहेत. यापैकी ही केवळ दुसरीच वेळ ठरली जेव्हा त्याने १०० पेक्षा कमी स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. या संयमी खेळीनंतर रोहित शर्मानं गियर बदलला. या अर्धशतकी खेळीचं तो शतकी खेळीत रुपांतर करेल, असे वाटत असताना मिचेल स्टार्कच्या एका असामान्य चेंडूवर तो ७३ धावांवर झेल बाद झाला. त्यानं ९७ चेंडूत ७३ धावांची खेळीत ७ चौकार आणि २ षटकार ठोकले.
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
फेव्हरेट पुल शॉटवर बॅक टू बॅक दोन षटकार! असा पराक्रम करणारा आशियातील पहिला बॅटर ठरला रोहित
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉपर होण्याची संधी असलेल्या रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दोन उत्तुंग षटकार मारले. भारताच्या डावातील १९ व्या षटकात रोहित शर्मानं मिचेल ओव्हन याच्या गोलंदाजीवर आपल्या भात्यातील पुल शॉटचा नजराणा पेश करताना सलग दोन षटकार मारले. यासह त्याने सेना देशांत १५० षटकार मारण्याचा डाव साधला. सेना देशांत १५० षटकार मारणारा रोहित शर्मा हा आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे.
सेना देशांत सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये):
- रोहित शर्मा (भारत) – १५० षटकार
- सनथ जयसूर्या (श्रीलंका) – ११३ षटकार
- शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – १०३ षटकार
- एम.एस. धोनी (भारत) – ८३ षटकार
- विराट कोहली (भारत) – ८३ षटकार
SENA देशांत रोहित शर्माच्या भात्यातून निघालेल्या षटकारांचा खास रेकॉर्ड
- ऑस्ट्रेलियायन मैदानात ५५ षटकार
- इंग्लंडच्या मैदानात ४८ षटकार
- न्यूझीलंडच्या मैदानात ३१ षटकार
- दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात १६ षटकार