Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS: धोनी दुसऱ्यांदा ठरला या मैदानात मॅच फिनिशर

याच अॅडलेडच्या मैदानात धोनीने भारताला 2012 सालीही सामना जिंकवून दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 17:27 IST

Open in App

अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीने दुसऱ्या सामन्यात दमदार नाबाद अर्धशतक साकारले. हे अर्धशतक साकारताना धोनीने आपण अजूनही मॅच फिनिशर आहोत, हे दाखवून दिले. पण याच अॅडलेडच्या मैदानात धोनीने भारताला 2012 सालीही सामना जिंकवून दिला होता.

कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनीने आपल्या भात्यातील फटके बाहेर काढले आणि आपण मॅच फिनिशर कसे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. धोनीने 54 चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद 55 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. धोनीने 2012 साली कर्णधारपदी असताना भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. 2012 सालीही धोनीने भारताच्या विजावर शिक्कामोर्तब केले होते. त्याच मैदानात पुन्हा एकदा धोनीला सूर गवसला आहे.

महेंद्रसिंग धोनी आता संपला, अशी टीका गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण या टीकेला धोनीने आपल्या स्टाईलनेच बॅटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने आपण मॅच फिनिशर आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया