Australia vs India, 2nd ODI : रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी केलेल्या शतकी भागीदारीनंतर अक्षर पटेलच्या उपयुक्त धावा आणि तळाच्या फलंदाजीत हर्षित राणाने फलंदाजीत दाखवलेली धमक याच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद २६४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरी गौतम गंभीर याने कुलदीप यादवला बाकावर बसवून वॉशिंग्टन सुंदरवर खेळलेला डाव फसवा ठरवणारी आहे का? असा प्रश्न निर्माण करणारी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित-श्रेयस अय्यरची अर्धशतके, अखेरच्या षटकात हर्षित राणाची फटकेबाजी
९ चेंडूत ९ धावांवर परतल्यावर त्याची जागा घेण्यासाठी आलेला विराट कोहली ४ चेंडूचा सामना करून खातेही न उघडता तंबूत परतला. १७ धावांवर भारतीय संघाने दोन विकेट्स गमावल्या होत्या. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. रोहित शर्मा ९७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार मारून ७३ धावांवर बाद झाला. झाम्पानं ६१ धावांवर श्रेयस अय्यरच्या खेळीला ब्रेक लावला. अक्षर पटेलनं केलेल्या ४४ धावा आणि तळाच्या फलंदाजीत हर्षित राणानं १८ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने केलेल्या नाबाद २४ धावांच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ९ बाद २६४ धावांपर्यंत मजल मारली.
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
ॲडम झाम्पा कामगिरी टीम इंडिया अन् गौतम गंभीरचा प्लॅन फसवा ठरवणारी?
ऑस्ट्रेलियनं संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात फिरकीपटू ॲडम झाम्पा या प्रमुख फिरकीपटूला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. त्याने आपल्या कर्णधाराचा आणि संघ व्यवस्थानापनाचा निर्णय सार्थ ठरवताना ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय झेवियर बार्टलेट याने ३ तर मिचेल स्टार्कनं २ विकेट्सचा डाव साधला. झाम्पाची कामगिरी गौतम गंभीर आणि टीम इंडियाच्या गेम प्लॅनवर प्रश्नचिन्ह करणारी आहे. कारण दुसऱ्या सामन्यात बाकावर बसलेल्या कुलदीप यादवला या सामन्यात संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण टीम इंडियाने पहिल्या वनडेतील प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग स्ट्रेंथ वाढवण्यासाठी फिरकीपटूच्या रुपात वॉशिंग्टन सुंदरला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. झाम्पाची गोलंदाजी पाहिल्यावर कुलदीप या खेळपट्टीवर आणखी घातक ठरला असता असे वाटते. त्यामुळेच गंभीरचा 'सुंदर' डाव फसवा ठरलाय का? असा प्रश्न निर्माण होतो. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रोखून मालिकेत बरोबरी साधली तर या प्रश्नाला मॅच संपल्यावरच पूर्ण विराम लागेल. पण जर ते शक्य झाले नाही तर हा मुद्दा निश्चितच चर्चेचा विषय ठरेल.