Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 1st Test : अश्विनच्या गोलंदाजीवर मार्श झाला बोल्ड आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला क्लीन बोल्ड केले आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 13:07 IST

Open in App
ठळक मुद्देआर. अश्विनने मार्शला दोन धावांवर असताना बोल्ड केले.यावेळी मार्शला फक्त दोन धावा करता आल्या.अँड्र्यू सॅमसन यांच्या नावावर १८८८ साली हा विक्रम होता.

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : एखादा विक्रम कधी आणि कसा मोडला जाईल, याचा काही नेम नसतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला क्लीन बोल्ड केले आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला. 

इशांत शर्माने आरोन फिंचला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का दिला. त्यानंतर फिरकीपटू आर. अश्विनने तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्यावेळी पीटर हँड्सकॉम्ब संघासाठी धावून आला, त्याने पाच चौकारांच्या जोरावर ३४ धावा केल्या. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव पूर्णपणे सावरलेला नव्हता. त्यावेळी हेडने चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. हेडने सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ६१ धावांची खेळी साकारली. हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद 191अशी मजल मारली आहे.

आर. अश्विनने मार्शला दोन धावांवर असताना बोल्ड केले आणि १३० वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत निघाला. मार्शला गेल्या सहा धावांमध्ये दोन अंकी धावसंख्या उभारता आलेली नाही. अँड्र्यू सॅमसन यांच्या नावावर १८८८ साली हा विक्रम होता. मार्शने गेल्या सहा धावांमध्ये अनुक्रमे 7,7,0,3,4,2 असा धावा केल्या आहेत.

टॅग्स :आर अश्विनभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया