IND vs AUS 1st Test : रिषभ पंतने टाकले धोनीलाही पिछाडीवर, बनवला हा विक्रम

आतापर्यंत भारताचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक असलेल्या महेंद्रसिंग धोनीलाही पंतने पिछाडीवर टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 12:29 IST2018-12-08T12:27:02+5:302018-12-08T12:29:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AUS 1st Test: rishabh pant brek ms dhoni record adelaide took six catches australia indian wicket keeper in australia | IND vs AUS 1st Test : रिषभ पंतने टाकले धोनीलाही पिछाडीवर, बनवला हा विक्रम

IND vs AUS 1st Test : रिषभ पंतने टाकले धोनीलाही पिछाडीवर, बनवला हा विक्रम

ठळक मुद्देपंतने ऑस्ट्रेलियामध्ये सहा झेल टिपत धोनीला पिछाडीवर सोडले आहे.धोनीने 2008 साली पर्थ येथे खेळताना पाच झेल टिपले होते.ऑस्ट्रेलियामधील सर्वोत्तम भारतीय यष्टीरक्षक होण्याचा मान पंतने पटकावला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा युवा यष्टीरक्षक आपला सहावा कसोटी सामना खेळत असला तरी त्याने विक्रम रचायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारताचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक असलेल्या महेंद्रसिंग धोनीलाही पंतने पिछाडीवर टाकले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंतने धमाकेदार कामगिरी केली. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलिया 235 धावांत गुंडाळले. यामध्ये सर्वात मोठा वाटा पंतचाही होता. कारण पंतने यष्टीरक्षण करताना सहा झेल टिपले आहे. पंतने उस्मान ख्वाजा, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेव्हि हेड, टिम पेन, मिशेल स्टार्क और जोश हेजलवुड यांचे झेल पकडले.

पंतने ऑस्ट्रेलियामध्ये सहा झेल टिपत धोनीला पिछाडीवर सोडले आहे. कारण धोनीने ऑस्ट्रेलियामध्ये 2008 साली पर्थ येथे खेळताना पाच झेल टिपले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियामधील सर्वोत्तम भारतीय यष्टीरक्षक होण्याचा मान पंतने पटकावला आहे.

Web Title: IND vs AUS 1st Test: rishabh pant brek ms dhoni record adelaide took six catches australia indian wicket keeper in australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.