Join us

IND vs AUS 1st Test : दीड वर्ष संघासोबत फिरला अन् आता मिळणार पदार्पणाची संधी; KL Rahulबाबत BCCIचा मोठा निर्णय

India vs Australia Test Series : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 12:34 IST

Open in App

India vs Australia Test Series : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. जसप्रीत बुमराह व रिषभ पंत या दोन प्रमुख खेळाडूंशिवाय भारतीय संघाला घरच्या मैदानावर कांगारूंचा सामना करावा लागणार आहे. या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताची प्लेइंग इलेव्हन काय असेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. अशात कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची कसोटी लागणार हे निश्चित आहे. फलंदाज व गोलंदाजी या प्रमुख आघाडीशिवाय भारताला यष्टिरक्षकाचीही समस्या भेडसावत आहे. पंतच्या दुखापतीमुळे लोकेश राहुल हा एक पर्यात भारतासमोर आहे, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये लोकेश यष्टिंमागे दिसण्याची शक्यता फार कमीच आहे. अशात मागील दीड वर्षांपासून संघासोबत देश-परदेश दौरे करणाऱ्या केएस भरतला ( KS Bharat) ला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. 

केएस भरत दीड वर्षांपासून भारतीय संघासोबत आहे, परंतु आता त्याला पदार्पणाची संधी मिळणार आहे. ''लोकेश राहुलला मागील वर्षभरात अनेक दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याला यष्टिरक्षण करायला लावणे योग्य ठरणार नाही. कसोटीसाठी स्पेशालिस्ट यष्टिरक्षक हवा. संघात भरत व इशान किशन हे दोन यष्टिरक्षक आहेत. या दोघांपैकी कोणाला खेळवायचे हे संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला सांगितले.

अशा परिस्थितीत इशानपेक्षा केएस भरतला संधी मिळू शकते. संघ व्यवस्थापनही लोकेश राहुलला कसोटीत यष्टिरक्षक करायला लावण्याच्या विरोधातच आहे. इशान हा पर्याय संघात असला तरी तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी योग्य उमेदवार आहे. कसोटीत भरतचे पारडे जड आहे. मे २०२१ मध्ये भरतचा भारतीय संघात समावेश केला गेला. वृद्धीमान सहाला बॅक अप म्हणून तो संघात आला. पण, त्याला दीड वर्षांत पदार्पणाची संधी मिळाली नाही.  

संपूर्ण वेळापत्रक (  Full Schedule)

पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूरदुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्लीतिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद

भारत ( पहिल्या दोन कसोटीसाठी)- रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स, ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुल
Open in App