Join us

IND vs AUS 1st Test : भारत आर्मीने असा केला पराक्रम की कोहलीलाही पडली भूरळ

भारत आर्मी अॅडलेडला येऊन धडकली आहे. अॅडलेडमध्ये त्यांनी असा काही पराक्रम केला की, भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही त्या गोष्टीची भूरळ पडली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 16:29 IST

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघ सराव सुरु करण्यासाठी मैदानात दाखल होत होता.त्यावेळी भारत आर्मीने एक पराक्रम केला.

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : प्रत्येक संघाचे चाहते असतात. सामाना सुरु असताना हे चाहते खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. इंग्लंडची बार्मी-आर्मी ही इंग्लंडची चाहत्यांची टीम प्रत्येक ठिकाणी जाऊन खेळाडूंना प्रोत्साहन देत असते. आता भारताचीही अशीच एक आर्मी तयार झाली आहे. भारत आर्मी, असे तिचे नाव. भारत आर्मी अॅडलेडला येऊन धडकली आहे. अॅडलेडमध्ये त्यांनी असा काही पराक्रम केला की, भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही त्या गोष्टीची भूरळ पडली.

भारतीय संघ सराव सुरु करण्यासाठी मैदानात दाखल होत होता. तेव्हा भारत आर्मी अॅडलेड स्टेडियमच्या छतावर चढली होती. छतावर चढून त्यांनी भारतीय संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. कोहली जेव्हा मैदानात आला तेव्हा या आर्मीने जोरात जल्लोष केला. नेमके काय घडले, ते या व्हिडीओमध्ये पाहा....

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली