Join us

IND vs AUS 1st Test : विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी डिवचले

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जरी कोहलीबरोबर स्लेजिंग करत नसले तरी चाहत्यांनी मात्र कोहलीला डिवचल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 12:43 IST

Open in App

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात लक्षवेधी ठरत आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जरी कोहलीबरोबर स्लेजिंग करत नसले तरी चाहत्यांनी मात्र कोहलीला डिवचल्याचे पाहायला मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यात कोहलीने 692 धावा केल्या होत्या. त्यामुळे या दौऱ्यात कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण कोहली मात्र पहिल्या सामन्यात तरी आपली छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे कोहली जेव्हा शनिवारी जेव्हा कोहली बाद झाल्यावर मैदान सोडत होता, तेव्हा चाहत्यांनी कोहलीची चांगलीच हुर्यो उडवल्याचे पाहायला मिळाले. 

डॉन ब्रॅडमन यांने मागे टाकत कोहली बनला सर्वोत्तम क्रिकेटपटूकोहलीने पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत 1000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. हा विक्रम करताना तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिगज्जाच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याचबरोबर कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकत सर्वोत्तम फलंदाज होण्याचाही मान पटकावला आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया