ठळक मुद्देपावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी १७ षटकांचा खेळवण्यात आला होता.ऑस्ट्रेलियाने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या.ऑस्ट्रेलियाने १५८ धावा केल्या असल्या तरी भारताने मात्र १७ षटकांत १६९ धावा केल्या
ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : एखादा संघ प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त धावा करतो आणि पराभूतही होते, असे तुम्हा कधी पाहिलंय का? पण ही गोष्ट घडली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्यात ट्वेन्टी-२० सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली होती. भारताने ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी १७ षटकांचा खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने १५८ धावा केल्या असल्या तरी भारताने मात्र १७ षटकांत १६९ धावा केल्या, पण तरीही त्यांचा पराभव झाला. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने याबाबतची पोस्ट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे.
ऑस्ट्रेलियाने १७ षटकांमध्ये १५८ धावा केल्या होत्या. पण पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतापुढे १७ षटकांत १७४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना १६९ धावा केल्या, त्यामुळे त्यांना चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला.