Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 1st T-20 : परदेशात पहिल्याच चेंडूवर मिळवला त्याने पहिला बळी

पहिलाच सामना खेळावा आणि पहिल्याच चेंडूवर पहिला बळी मिळवावा, हे सारे भारताच्या एका युवा गोलंदाजाच्या नशिबात होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 15:28 IST

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचचा सोपा झेल भारताचा कर्णधार विराट कोहलीने सोडला.त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यावेळी भारताला पहिल्या विकेटची गरज होती. त्यावेळी खलील संघासाठी धावून आला.

ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पहिल्याच परदेश दौऱ्यात जावं. पहिलाच सामना खेळावा आणि पहिल्याच चेंडूवर पहिला बळी मिळवावा, हे सारे भारताच्या एका युवा गोलंदाजाच्या नशिबात होते. पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने संयत सुरुवात केली होती. त्यावेळी भारताला पहिले यश मिळवून दिले ते युवा वेगवान गोलंदाज खलील अहमदने.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचचा सोपा झेल भारताचा कर्णधार विराट कोहलीने सोडला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यावेळी भारताला पहिल्या विकेटची गरज होती. त्यावेळी खलील संघासाठी धावून आला.

सामन्याच्या पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर खलीलने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डी' आर्सी शॉर्टला कुलदीप यादवकरवी सात धावांवर झेलबाद केले.

सामन्यापूर्वी जिंकली कोहलीने चाहत्यांची मने, पाहा हा व्हीडीओ

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली