IND vs AUS 1st ODI Did Mitchell Starc Bowl 176-5 kph Delivery To Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थच्या मैदानातील एकदिवसीय सामन्यात पावसाच्या बॅटिंगशिवाय मिचल स्टार्कनं हिटमॅन रोहित शर्माला टाकलेल्या एक चेंडू चर्चेचा विषय ठरतोय. पर्थ वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कनं तर टीम इंडियाकडून रोहित शर्मानं डावाची सुरुवात केली. स्टार्कनं जो पहिला चेंडू टाकला तो क्रिकेटच्या मैदानातील कोणत्याही गोलंदाजाने फेकलेला वेगवान चेंडू आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे पाहायला मिळाली . इथं जाणून घेऊयात ही चर्चा रंगण्यामागचं कारण आणि त्यात किती तथ्य आहे यासंदर्भातील सविस्तर गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खरंच स्टार्कनं क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात स्टार्क घेऊन आलेल्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्मानं एकेरी धाव घेत आपले आणि संघाचे खाते उघडले. या दरम्यान टेलिव्हिजन स्क्रीनवर झळकणाऱ्या स्कोअर कार्डवर स्टार्कनं टाकलेल्या चेंडूचा वेग १७१.५ kph एवढा होता, असे दाखवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे स्टार्कनं पाकिस्तानच्या शोएब अख्तरचा रेकॉर्ड सर्वात जलदगतीने चेंडू टाकण्याचा विश्व विक्रम मोडीत काढत नवा विक्रम रचल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
स्टार्कसंदर्भात सोशल मीडियावरील करण्यात आलेल्या दाव्यात तथ्य किती? जाणून घ्या खरी गोष्ट
क्रिकेटच्या मैदानात सर्वात जलदगतीने चेंडू टाकण्याचा विक्रम हा पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावे आहे. २००३ मध्ये अख्तरनं इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात १६१.३ kph वेगाने चेंडू टाकला होता. हा एक विश्वविक्रम आहे. आता स्टार्कनं हा विक्रम मोडत नवा पराक्रम नोंदवला का? तर याचं उत्तर नाही असं आहे. क्रिकबझच्या वृत्तानं याची पुष्टी झाली आहे. मिचेल स्टार्कनं टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जो पहिला चेंडू टाकला त्या चेंडूचा वेग १४०.८ kph इतका होता. पण तांत्रिक चुकीमुळे त्याने टाकलेल्या चेंडू वेग १७१.५ kph असा फ्लॅशवर दिसून आले, असा उल्लेखही क्रिकबझच्या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
स्टार्कनं विराटच्या रुपात घेतली महत्त्वपूर्ण विकेट
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात रोको अर्थात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भात्यातून धावांची 'बरसात' पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. याउलट पावसाच्या बॅटिंगमुळे सातत्याने खेळात व्यत्यय निर्माण झाला. परिणामी हा सामना प्रत्येकी २६-२६ षटकांचा करण्यात आला. स्टार्कनं ६ षटकात २२ धावा खर्च करताना विराट कोहलीच्या रुपात एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
Web Summary : Claims of Starc bowling a 176.5 kph delivery to Rohit Sharma are false. Technical glitch showed incorrect speed during the match; the actual speed was 140.8 kph. Starc did dismiss Kohli.
Web Summary : रोहित शर्मा को स्टार्क द्वारा 176.5 किमी प्रति घंटे की गति से गेंद फेंकने का दावा झूठा है। तकनीकी खराबी के कारण मैच के दौरान गलत गति दिखाई गई; वास्तविक गति 140.8 किमी प्रति घंटा थी। स्टार्क ने कोहली को आउट किया।