Join us

IND vs AUS, 1st ODI Live : देखो कौन आया! टीम इंडियाला चिअर करण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत वानखेडेवर उपस्थित, Video

India vs Australia 1st ODI Live : युवा व अनुभवी खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या हार्दिक पांड्याच्या संघाने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाची कोंडी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 14:08 IST

Open in App

India vs Australia 1st ODI Live : युवा व अनुभवी खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या हार्दिक पांड्याच्या संघाने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाची कोंडी केली. मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचा ( ५) त्रिफळा उडवला आणि भारताला यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूने मोहम्मद शमीने टिच्चून मारा करताना ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला वेसण घातले होते. स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श खेळपट्टीवर उभे आहेत. दरम्यान, भारतीय संघाचे मनोबल उंचावण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत ( Rajnikanth ) वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी रनजीकांत यांनी युवा फलंदाज संजू सॅमसन याला आपल्या घरी बोलावून पाहुणचार केला होता. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.भारतीय संघ ४ जलदगती गोलंदाज ( हार्दिक, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी), दोन फिरकीपटू ( रवींद्र जडेजा व कुलदीप यादव) यांच्यासह ५ फलंदाजांची फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे. लोकेश राहुल यष्टिंमागे दिसणार आहे. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला धक्का देताना ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला. रजनीकांत यांच्या उपस्थितीचं 'ट्विट पाहण्यासाठी क्लिक करा'   

 

भारतीय संघ ४ जलदगती गोलंदाज ( हार्दिक, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी), दोन फिरकीपटू ( रवींद्र जडेजा व कुलदीप यादव) यांच्यासह ५ फलंदाजांची फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे. लोकेश राहुल यष्टिंमागे दिसणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद सिराज
Open in App