India vs Australia 1st ODI Live : युवा व अनुभवी खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या हार्दिक पांड्याच्या संघाने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाची कोंडी केली. मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचा ( ५) त्रिफळा उडवला आणि भारताला यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूने मोहम्मद शमीने टिच्चून मारा करताना ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला वेसण घातले होते. स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श यांनी ७२ धावांची भागीदारी करून कांगारूंचा डाव रुळावर आणला. कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) ही भागीदारी तोडताना भारताला मोठं यश मिळवून दिले. यष्टिंमागे लोकेश राहुलने ( KL Rahul) कमाल करून दाखवली.
OMG! ५०० रुपये किलो भात, १००० रुपये किलो पिठ; विराट कोहलीचा नादच खुळा
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.भारतीय संघ ४ जलदगती गोलंदाज ( हार्दिक, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी), दोन फिरकीपटू ( रवींद्र जडेजा व कुलदीप यादव) यांच्यासह ५ फलंदाजांची फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे. लोकेश राहुल यष्टिंमागे दिसणार आहे. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला धक्का देताना ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला.
स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श यांनी भारतीय गोलंदाजांची अडचण केली होती. ही जोडी तोडण्यासाठी शार्दूल ठाकूरला बोलावण्यात आले आणि त्याच्या गोलंदाजीवर स्मिथला LBW दिले गेले. पण, त्याने DRS घेतला अन् जीवदान मिळालं. मात्र पुढच्याच म्हणजे १२व्या षटकात हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. यष्टिरक्षक लोकेश राहुलने सुरेख झेल टिपला. स्मिथ २२ धावांवर माघारी परतला अन् मार्शसोबत त्याची ७२ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. मार्शने अर्धशतक पूर्ण करताना काही अप्रतिम षटकार खेचून संघाची धावसंख्या शतकपार नेली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"