Join us

IND v WI 2018: भारतीय संघाच्या मालिका विजयानंतर कोहलीनं केलं ट्विट...

IND v WI ​​2018: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 अशी धुळ चारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:45 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 ने विजयवेस्ट इंडिजचे आव्हान सहज परतवलेविराट कोहलीकडून कौतुक

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 अशी धुळ चारली. ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये विंडीज संघाची दबदबा लक्षात घेता या मालिकेत त्यांच्याकडून कडव्या टक्करची अपेक्षा होती, त्यांना अपेक्षांवर खरं उतरता आले नाही. 

ट्वेंटी-20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला आणि मालिका 3-0 अशी खिशात घातली. शिखर धवन ( 92) आणि रिषभ पंत ( 58) यांनी दमदार खेळ करताना भारताला विजय मिळवून दिला. भारताने 183 धावांचे लक्ष्य सहा विकेट्स राखून पार केले. 

भारतीय संघाच्या या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर खेळाडूंचे अभिनंदन केले. तो म्हणाला, खेळाडूंनी चागंली कामगिरी करताना आणखी एक मालिका जिंकली. खेळाडू, सहकारी खेळाडू आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन.    

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयभारत विरुद्ध वेस्ट इंडिज