वैभव सूर्यवंशी कसोटीत टी-२० स्टाईल मारायला गेला अन् 'गोल्डन डक' झाला (VIDEO)

पहिल्या डावातही मोठी खेळी करण्यात ठरला होता अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 22:02 IST2025-07-23T21:52:17+5:302025-07-23T22:02:41+5:30

whatsapp join usJoin us
IND U19 vs ENG U19 Vaibhav Suryavanshi Out On A Golden Duck Video Goes Viral | वैभव सूर्यवंशी कसोटीत टी-२० स्टाईल मारायला गेला अन् 'गोल्डन डक' झाला (VIDEO)

वैभव सूर्यवंशी कसोटीत टी-२० स्टाईल मारायला गेला अन् 'गोल्डन डक' झाला (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Vaibhav Suryavanshi Golden Duck : एका बाजूला शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मँचेस्टरच्या मैदानात चौथा कसोटी सामना खेळत असताना दुसऱ्या बाजूला १९ वर्षाखालील भारतीय संघही इंग्लंडमध्ये कसोटी खेळत आहे. भारत आणि इंग्लंड अंडर १९ संघातील दुसरा कसोटी सामना चेम्सफोर्डच्या मैदानात सुरु आहे. या सामन्यात क्रिकेट जगतालील युवा सेंसेशन असलेल्या वैभव सूर्यवंशीवर गोल्डन डकची नामुष्की ओढावली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वैभव सूर्यवंशी पहिल्याच चेंडूवर झाला बाद

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड अंडर १९ संघाने भारतीय अंडर १९ संघासमोर विजयासाठी ३५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. १४ वर्षीय स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशी खातेही न उघडता तंबूत परतला. एलेक्स ग्रीन याने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले.

KL राहुलनं दाखवला क्लास! १००० धावांसह तेंडुलकर-द्रविडसह गावसकरांच्या क्लबमध्ये एन्ट्री

कसोटीत टी-२० अंदाज नडला, विकेट पडल्यावर चेहरा पडला

वैभव सूर्यंवंशी याने टी-२० सह वनडेत आपल्या स्फोटक अंदाजाने खास छाप सोडली आहे. कसोटी सामन्यात हाच अंदाज दाखवण्याच्या नादात तो फसला. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादत त्याने विकेट गमावली. बॅटची कड घेऊन चेंडू स्टंपवर आदळला अन् त्याचा खेळ पहिल्याच चेंडूवर खल्लास झाला. विकेट गमावल्यावर त्याचा चेहराच पडला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

पहिल्या डावातही ठरला होता अपयशी

पहिल्या डावातही वैभव सूर्यवंशी याला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. अवघ्या २० धावावर एलेक्स ग्रीन यानेच त्याची शिकार केली होती. तो अपयशी ठरल्यावर आयुष म्हात्रे याने केलेल्या ८० धावांच्या खेळीसह विहान मल्होत्रा याने केलेल्या १२० धावांच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात २७९ धावा केल्या होत्या.

इंग्लंडच्या संघाकडून या दोघांनी केली मोठी खेळी  

पहिल्या डावात मिळालेल्या ३१ धावांच्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाने ३२४ धावांवार डाव घोषित करत युवा टीम इंडियासमोर ३५६ धावांचे टार्गेट सेट केले आहे. इंग्लंडच्या युवा संघाकडून बी.जे. डॉकिन्स याने १३६ धावा तर एडम थॉमस याने ९१ धावांची खेळी केली. 

Web Title: IND U19 vs ENG U19 Vaibhav Suryavanshi Out On A Golden Duck Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.