Join us  

टिम पेनच्या समावेशाने लक्ष विचलित होणार नाही - लियॉन

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने पेनचा संघात समावेश झाल्यास खेळाडूंचे मालिकेवरील लक्ष विचलित होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 9:28 AM

Open in App

गोल्ड कोस्ट : ‘महिला सहकारीला अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी संघाचे कर्णधारपद सोडलेल्या टिम पेनला ऑस्ट्रेलिया कसोटी संघात निवडले, तरी ॲशेस मालिकेदरम्यान संघाचे लक्ष विचलित होणार नाही,’ असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉन याने व्यक्त केले.ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने पेनचा संघात समावेश झाल्यास खेळाडूंचे मालिकेवरील लक्ष विचलित होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर लियॉनने आपले मत मांडले. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लियॉन म्हणाला की, ‘पेनला संघात समाविष्ट केल्याने खेळावरून संघाचे लक्ष विचलित होईल, असे मला वाटत नाही. आम्ही सगळे व्यावसायिक खेळाडू आहोत आणि प्रत्येकाला माहीत आहे की, काय करायचे आहे.’लियॉन पुढे म्हणाला की, ‘ॲशेस मालिकेसाठी निवडकर्ते सर्वोत्तम संघ निवडणार आहेत आणि माझ्या नजरेत पेन सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. मला तो संघात पाहिजे. एक गोलंदाज म्हणून माझा स्वार्थ असेल, पण मला यष्ट्यांमागे एक सर्वोत्तम यष्टिरक्षक पाहिजे. यासाठी माझ्या नजरेत केवळ पेन हाच आहे.’

प्रत्येक कसोटी गोलंदाजाचे पेनसोबत चांगले संबंध आहेत. तो खूप चांगला व्यक्ती आहे. ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रुममधील तो एक सन्मानित व्यक्ती आहे.- नॅथन लियॉन 

टॅग्स :आॅस्ट्रेलिया
Open in App