Join us

IPL 2023: "हे सगळं कुठून आलं ते मलाही माहित नाही...", मॅचविनिंग खेळीनंतर गॉड शार्दुलची प्रतिक्रिया

RCB vs KKR : आयपीएलच्या १६व्या हंगामातील नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 11:05 IST

Open in App

shardul thakur ipl 2023 । कोलकाता : आयपीएलच्या १६व्या हंगामातील नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. मोठ्या कालावधीनंतर आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या केकेआरच्या संघाने आरसीबीचा दारूण पराभव करून विजयाचे खाते उघडले. मराठमोळ्या शार्दुल ठाकूरने केकेआरसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने निर्धारित २० षटकांत ७ बाद २०४ धावा केल्या. शार्दुल ठाकूरने २९ चेंडूत ६८ धावांची स्फोटक खेळी करून आरसीबीच्या गोलंदाजांना घाम फोडला. 

लॉर्ड शार्दुलची स्फोटक खेळीप्रथम फलंदाजी करताना सुरूवातीला केकेआरच्या संघाची अवस्था बिकट झाली होती. गुरबाज वगळता संघाचे आघाडीचे ५ फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. धावांसाठी संघर्ष करत असलेला केकेआरचा संघ १५० धावा करेल का याबद्दल देखील संभ्रम होता. पण शार्दुलने चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत आरसीबीची वाट लावली. ९ चौकार आणि ३ षटकार ठोकून त्याने केकेआरची धावसंख्या २०० पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 

मॅचविनिंग खेळीनंतर गॉड शार्दुलची प्रतिक्रिया सामना संपल्यानंतर शार्दुल ठाकूरने खेळीबद्दल बोलताना म्हटले, "मला देखील माहिती नाही की हे कुठून आले पण त्यावेळी धावफलक पाहून सर्वांना वाटत होते की, आम्ही संघर्ष करत आहोत. अशावेळी अशी खेळी करण्यासाठी आपल्यात कौशल्य असणे देखील गरजेचे आहे. पण आम्ही सराव सत्रात देखील खूप मेहनत करायचो. कोचिंग स्टाफ आमच्याकडून फलंदाजीचा देखील सराव करून घेतात, ज्यामुळे आपल्याला खूप मदत होते." 

तसेच सुयश शर्माने शानदार गोलंदाजी केली आणि आम्ही सुनील नरेन आणि वरूण चक्रवर्ती यांची क्षमता जाणून आहोत. ते संघाला मोक्याच्या वेळी बळी घेऊन देतात. हा खरंच एक अविस्मरणीय दिवस होता, असे शार्दुलने अधिक सांगितले. खरं तर सुयश शर्मा इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात आला आणि त्याने ३ बळी घेऊन आरसीबीच्या फलंदाजीची कंबर मोडली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशार्दुल ठाकूरविराट कोहली
Open in App