Join us

IPL 2023 : झूमे जो पठाण...! सामना संपताच २ 'किंग' थिरकले; Videoनं चाहत्यांची जिंकली मनं

kkr vs rcb 2023 : आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 10:20 IST

Open in App

shahrukh khan ipl and virat kohli । कोलकाता : गुरूवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या (IPL 2023) हंगामातील नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKR vs RCB) यांच्यात पार पडला. केकेआरच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावर मोठा विजय मिळवून चाहत्यांना खुश केले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने निर्धारित २० षटकांत ७ बाद २०४ धावा केल्या. शार्दुल ठाकूरने २९ चेंडूत ६८ धावांची स्फोटक खेळी करून आरसीबीच्या गोलंदाजांना घाम फोडला. 

२ 'किंग' थिरकलेदरम्यान, सामना पार पडताच आरसीबीचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज आणि बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान दोघेही पठाण चित्रपटातील झूमे जो पठाण गाण्यावर थिरकल्याचे पाहायला मिळाले. शाहरूखने विराट कोहलीला सर्वप्रथम मिठी मारून डान्सच्या काही टिप्स शिकवल्या. यानंतर दोघांनीही गाण्यावर डान्स करून चाहत्यांची मनं जिंकली.

सुहाना आणि शनायाचा जलवा आयपीएलमधील कालचा सामना पाहण्यासाठी शाहरूख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खानने देखील हजेरी लावली होती. सुहानासोबत तिची मैत्रीण शनाया कपूर देखील उपस्थित होती. सुहानाने शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंग यांच्या अप्रतिम खेळीचे खूप कौतुक केले. शार्दुल (६८), रिंकू सिंग (४६) आणि रहमानुल्लाह गुरबाज (५७) यांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने आरसीबीला तगडे आव्हान दिले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीशाहरुख खानरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स
Open in App