इम्रानच्या आमंत्रणाची कपिलला प्रतीक्षा

इम्रान खानने अद्याप आपल्याला पंतप्रधानपदाच्या शपथविधीला निमंत्रित केले नसल्याचे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्पष्ट केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 04:03 IST2018-08-05T04:03:03+5:302018-08-05T04:03:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Imran's invitation to Kapilal | इम्रानच्या आमंत्रणाची कपिलला प्रतीक्षा

इम्रानच्या आमंत्रणाची कपिलला प्रतीक्षा

बंगळूरु : इम्रान खानने अद्याप आपल्याला पंतप्रधानपदाच्या शपथविधीला निमंत्रित केले नसल्याचे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्पष्ट केले. मात्र या समारंभाला उपस्थित राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
येथे आयोजित कार्यक्रमावेळी कपिल म्हणाले,‘ मला आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र लेखी स्वरुपात अद्याप आमंत्रण मिळालेले नाही. इम्रान खान यांच्या कार्यालयातून मला फोन आला होता. मात्र मला अद्याप अधिकृत मेल आलेला नाही. ते म्हणाले, ‘ मला आमंत्रित केल्यास मी नक्कीच पाकिस्तानला जाण्याचा प्रयत्न करेन.’ त्यांनी इम्रानला पंतप्रधान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Imran's invitation to Kapilal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.