‘स्वत:च्या कौशल्यावर सातत्याने मेहनत घेत दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता खऱ्या अर्थाने टी२० गोलंदाज बनलो,’ अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने दिली. शार्दुलने पहिला टी२० सामना २२ महिन्याआधी खेळला होता. लंकेविरुद्ध दुसºया टी२० सामन्यात त्याने २३ धावात ३ गडी बाद केले. २०१८ साली लंकेविरुद्धकेलेल्या गोलंदाजीच्या तुलनेत यावेळी डेथ ओव्हरमध्ये त्याने सुधारणा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
शार्दुल म्हणाला,‘ माझ्यामते टी२०सारख्या वेगवान प्रकारात मोठे चढउतार पहायला मिळतात. जितेक अधिक चेंडू खेळाल, तितका ाधिक अनुभव मिळतो. कसोटीत तुम्हाला विचार करण्यास भरपूर वेळ मिळतो. टी२० मात्र झटपट निर्णय घ्यावा लागतो. मागील काही पर्वात सलग आयपीएल खेळण्याचाही मला लाभ झाला.’ शार्दुल पुढे म्हणाला, ‘सरावादरम्यान स्वत:च्या बलस्थानांवर अधिक भर द्यावा लागतो. सरावादरम्यान कौशल्यही सुधारत आहे. मागच्या दोन- तीन वर्षांत आयपीएल खेळण्याचा लाभ झाला. त्यात गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांचे योगदान मोलाचे ठरले.’
‘सध्यातरी कुठल्या विशेष प्रशिक्षकासोबत काम करणे फार कठीण आहे. भारतीय संघातून आतबाहेर होत असतो. कधी मुंबईकडून खेळत असतो तर आयपीएल चेन्नईकडून खेळतो. अशावेळी एका प्रशिक्षकासोबत काम करणे कठीण होते. मात्र राष्टÑीय गोलंदाजी प्रशिक्षक अरुण यांचे योगदान माझ्या यशात मोलाचे ठरले आहे,’ असेही शार्दुलने सांगितले.
>मला जितके शक्य होईल, तितके निर्धाव चेंडू टाकतो. आंतरराष्टÑीय सामन्यात एका षटकात तीन गडी बाद केल्याबद्दल आनंद आहे. नवदीप सैनी यानेही उत्कृष्ट मारा केला. तो बाऊन्सर आणि यॉर्करचे उत्तम मिश्रण ठेवून समर्पितपणे मारा करतो. - शार्दुल ठाकूर