Pakistan cricketer imad wasim second marriage: पाकिस्तानचा क्रिकेटपटू इमाद वसीम याने दुसरे लग्न केले आहे. मात्र, दुसऱ्या लग्नानंतर त्याच्यावर स्वतःच्याच बाळाची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याची पहिली पत्नी सानिया अशफाक हिने इमादवर हा खळबळजनक आरोप केला आहे. इमाद वसीमच्या दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकताच सानिया अशफाकने इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट पोस्ट केल्या. काही पोस्टमध्ये तिने इमादला खुनी म्हटले, तर काही पोस्टमध्ये तिने त्याच्या दुसऱ्या पत्नीला 'इतरांचा संसार मोडणारी' असे संबोधले. जाणून घेऊया नेमके प्रकरण काय...
इमाद वसीमचं दुसरं लग्न कुणाशी?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इमाद वसीम याने वकील आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नायला रझा हिच्याशी दुसके लग्न केले आहे. वसीमने सोशल मीडियाद्वारे त्याच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी पसरल्यानंतर, वसीमची पहिली पत्नी सानिया अशफाक हिने इमादवर स्वतःच्याच बाळाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. वसीमला सानियापासून तीन मुले आहेत, परंतु आता त्यांचा घटस्फोट झाला आहे.
----
पहिली पत्नी म्हणते- इमाद वसीम 'खुनी'
सानिया अशफाकने इमाद वसीमबद्दल सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्याने डिसेंबर २०२३मध्ये लाहोरमध्ये मला गर्भपात करायला लावला आणि आमच्या होणाऱ्या बाळाची हत्या केली. तो एक खुनी आहे आणि माझ्याकडे हे आरोप सिद्ध करणारा व्हिडिओ आहे. त्याने माझा विश्वासघात केला. इस्लामाबाद युनायटेडने पीएसएलमध्ये एका खुनी आणि विश्वासघातकी व्यक्तीला खेळण्याची संधी दिली आहे. अशाप्रकारच्या फसव्या आणि खुनी व्यक्तीला सोडू नका.
वसीमच्या दुसऱ्या पत्नीवर टीका
सानियाने इमादच्या दुसऱ्या पत्नीला घर-संसार तोडणारी म्हटले. सानिया अशफाकने इमाद वसीमच्या नायला रझासोबतच्या दुसऱ्या लग्नाच्या फोटोवर लिहिले होते की, आता सर्वांना त्या घर-संसार मोडणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसतोय, जिने माझ्या मुलांबद्दल कधीही विचार केला नव्हता. आता तिचा खरा चेहरा उघड झाला आहे. मला फक्त माझ्या मुलांसाठी न्याय हवा आहे.
दुसऱ्या पत्नी मुलं सांभाळण्यास तयार
नायला रझा इमादच्या मुलांना दत्तक घेण्यास तयार आहे. इमाद वसीमशी लग्न केल्यानंतर, नायला रझा हिने सोशल मीडियावर म्हणले आहे की, जर अल्लाहने इमादला त्याच्या मुलांशी पुन्हा जोडले तर मी त्यांचे खुल्या मनाने स्वागत करण्यास तयार आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, इमाद वसीम त्याच्या पहिल्या पत्नीच्या गरोदरपणात नायला रझा सोबत रिलेशनशिपमध्ये होता. जेव्हा सानिया अशरफला हे कळले तेव्हा ते दोघे वेगळे झाले. वसीमने सोशल मीडियाद्वारे सानियापासून घटस्फोटाची घोषणा केली. त्या पोस्टमध्ये इमादने त्यांच्या मुलांबद्दलही लिहिले. त्याने सांगितले की तो त्यांच्या तिन्ही मुलांना सांभाळण्यास तयार आहे.
Web Summary : Pakistani cricketer Imad Wasim faces accusations from his ex-wife, Sannia Ashfaq, of murder after his second marriage. She claims he forced her to have an abortion in December 2023 and alleges infidelity. She also criticized Wasim's new wife, calling her a home-wrecker.
Web Summary : पाकिस्तानी क्रिकेटर इमाद वसीम पर दूसरी शादी के बाद उनकी पूर्व पत्नी सानिया अशफाक ने हत्या का आरोप लगाया है। उनका दावा है कि उन्होंने दिसंबर 2023 में उन्हें गर्भपात कराने के लिए मजबूर किया और बेवफाई का आरोप लगाया। उन्होंने वसीम की नई पत्नी की भी आलोचना की, उन्हें घर तोड़ने वाली कहा।