Virat Kohli on his Form IPL 2022 : एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला कधीही जास्त महत्त्व दिले नाही, पण आता... !; विराट कोहलीचे मोठे विधान

Virat Kohli on his Form IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) संघ आज इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये स्वतःचं आव्हान टीकवण्यासाठी गुजरात टायटन्सला भिडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:12 PM2022-05-19T17:12:09+5:302022-05-19T18:09:36+5:30

whatsapp join usJoin us
I'm in the happiest phase of my life, a phase of evolution for me- Royal Challengers Bangalore’s star batsman Virat Kohli  | Virat Kohli on his Form IPL 2022 : एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला कधीही जास्त महत्त्व दिले नाही, पण आता... !; विराट कोहलीचे मोठे विधान

Virat Kohli on his Form IPL 2022 : एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला कधीही जास्त महत्त्व दिले नाही, पण आता... !; विराट कोहलीचे मोठे विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli on his Form IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) संघ आज इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये स्वतःचं आव्हान टीकवण्यासाठी गुजरात टायटन्सला भिडणार आहे. आज पराभव झाल्यास RCBचे प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आजच्या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहली याच्याकडून फार अपेक्षा आहेत. विराटला १३ सामन्यांत १९.६७च्या सरासरीने २३६ धावा केल्या आहेत. मागील दोन वर्षांत त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. अशात विराटने Star Sports show ‘INSIDE RCB’ला दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या फॉर्माबद्दल परखड मत मांडले आहे. 

तो म्हणाला,''माझे अनुभव माझ्यासाठी पवित्र आहेत. या टप्प्यात किंवा भूतकाळात मी जे काही अनुभवले आहे, मी एका गोष्टीची खात्री देऊ शकतो ती म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला कधीही जास्त महत्त्व दिले नाही. कारण जगाने तुमच्यासाठी निर्माण केलेली ओळख खूप मोठी आहे, जी खूप वेगळी आहे आणि एक माणूस म्हणून तुमच्या वास्तविकतेपेक्षा वेगळी आहे, हे मी आता अनुभवत आहे.  मी माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या टप्प्यात आहे. मी मैदानावर जे काही करतो त्यात मला स्वत:ची किंमत किंवा मूल्य आढळत नाही. माझ्यासाठी हा उत्क्रांतीचा टप्पा आहे.''

''मी समान मार्गावर नाही, असे मला म्हणायचे नाही, माझा मार्ग मी बदलणार नाही. ज्यादिवशी मी मार्ग बदलीन त्यादिवशी मी हा खेळ खेळणं सोडून देईन. पण, एखाद्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणे हे आपल्याही हातात नसते. जीवनात कठोर परिश्रम करत राहणे, हे आपल्या हातात असते. संघासाठी मला पाहिजे तितके योगदान देता आलेले नाही. ही गोष्ट मला नेहमी निराश करते. पण, मी माझ्या संघाला निराश करू इच्छित नाही,''असेही विराटने स्पष्ट केले. 

एक कर्णधार ते खेळाडू या बदलाबाबत विराट म्हणाला,'' खरे सांगायचे तर ते वेगळे आहे. मी असे म्हणणार नाही की हे कठीण आहे, कारण हे असे काहीतरी आहे ज्यामध्ये तुम्ही नियमितपणे सहभागी आहात. चांगली गोष्ट म्हणजे माझे फॅफ ड्यू प्लेसिससोबतचे नाते नेहमीच चांगले राहिले आहे. मैदानावरही, जेव्हा फॅफ आऊटफिल्डवर असतो आणि मी आत असतो, तेव्हा मी क्षेत्ररक्षणावर लक्ष देतो. तसे स्वातंत्र्य त्याने मला दिले आहे. ''

Web Title: I'm in the happiest phase of my life, a phase of evolution for me- Royal Challengers Bangalore’s star batsman Virat Kohli 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.