"तर रोहित शर्माला Mumbai Indians मधून हाकलून दिलं असतं..."; माजी कर्णधाराचं विधान

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2025 MI vs KKR: सुरुवातीच्या तीनही सामन्यात रोहित शर्मा 'फ्लॉप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:40 IST2025-04-01T09:40:08+5:302025-04-01T09:40:43+5:30

whatsapp join usJoin us
If your name is not Rohit Sharma you are losing your place in Mumbai Indians said Michael Vaughan IPL 2025 MI vs KKR | "तर रोहित शर्माला Mumbai Indians मधून हाकलून दिलं असतं..."; माजी कर्णधाराचं विधान

"तर रोहित शर्माला Mumbai Indians मधून हाकलून दिलं असतं..."; माजी कर्णधाराचं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2025 MI vs KKR: सलामीचे दोन सामने हरल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा विजय मिळाला. कोलकाता विरूद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने ८ विकेट्स राखून दमदार विजयी कमबॅक केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना केवळ ११६ धावा केल्या. पदार्पणाच्या सामन्यात मुंबईचा गोलंदाज अश्वनी कुमारने ४ बळी घेत KKR ला दणका दिला. त्यानंतर मुंबईच्या संघाने १२.५ षटकांत आव्हान पार केले. वानखेडेवर मुंबईचा पहिलाच सामना होता, त्यामुळे रोहित शर्माकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो केवळ १३ धावा काढून बाद झाला. सलग तिसऱ्या सामन्यात रोहित अपयशी ठरल्यानंतर त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. तशातच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने त्याच्यावर बोचरी टीका केली आहे.

"तुम्ही रोहित शर्माचे सध्याचे आकडे पाहा. आपण त्याला आता केवळ फलंदाज म्हणून जज करतोय. कारण आता तो संघाचा कॅप्टन राहिलेला नाही. रोहित गेल्या काही सामन्यात चांगला खेळलेला नाही. सध्या तो संघात आहे त्याचे कारण त्याने आतापर्यंत केलेल्या खेळीची सरासरी. सध्याची कामगिरी पाहता, जर त्याचे नाव रोहित शर्मा नसते तर आतापर्यंत मुंबई इंडियन्सने संघातून बाहेर हाकलून दिले असते. म्हणजेच दुसऱ्या एखाद्या खेळाडूने जर दोन-तीन सामन्यात त्याच्यासारखी कामगिरी केली असती तर त्याला कधी ना कधी संघाबाहेर बसवण्यात आलेच असते. आताचे आकडे हे रोहित शर्मा या नावाला साजेसे नाहीत," अशा शब्दात मायकल वॉनने रोहितवर टीका केली.

"मला असं म्हणायचं नाही की ते रोहित शर्माला संघातून काढू शकतात. मी देखील त्याला संघातून काढलं नसतं. पण मी त्याला सांगितलं असतं की आम्हाला तुझ्याकडून दमदार सलामीची अपेक्षा आहे. तू तुझ्या जुन्या फॉर्ममध्ये लवकर परत ये, तुझी लय पकड आणि दमदार फलंदाजी करून दाखव. कारण मुंबईच्या या नवीन संघात काही युवा मंडळीही आहेत. त्यांच्यासमोर बडे खेळाडू आणि अनुभवी खेळाडूंनी चांगली कामगिरी करणे अपेक्षितच आहे. त्यानेच तुम्हाला विजयी लय प्राप्त होईल," असेही वॉन म्हणाला.

Web Title: If your name is not Rohit Sharma you are losing your place in Mumbai Indians said Michael Vaughan IPL 2025 MI vs KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.