Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची गेल्या वर्षातील कमाई पाहाल तर हैराण व्हाल...

गेल्या वर्षी विराटला क्रिकेट सामने, जाहिराती आणि आयपीएलने भरघोस कमाई करून दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 16:35 IST

Open in App

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात आहे. २०१९ हे वर्षदेखील विराटने चांगलेच गाजवले. विराटने मैदानात चांगल्या धावा केल्या, संघाचे नेतृत्व करताना बरेच सामने जिंकवून दिले. पण मैदानाबाहेरही विराटची चांगलीच चलती पाहायला मिळाली. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी गेल्या फक्त एका वर्षात किती करोडो रुपयांची कमाई केली, हे तुम्हाला ऐकाल तेव्हा हैराण व्हाल...

एक क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून कोहलीने चांगलेच नाव कमावले आहे. त्यामुळे विराटला बऱ्याच जाहीराती मिळालेल्या आहे. विराटवर एक मालिकाही सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे विराट लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वर्गात लाडका ठरलेला आहे. त्यामुळे विराटच्या जाहिरातींनाही चांगलीच प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विराटबरोबर पत्नी अनुष्कानेही गेल्या वर्षात तगडी कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकताच 'GQ'चा एक अहवाल प्रसिद्ध झाला. ही कंपनी आर्थिक गोष्टींचा अहवला सादर करत असते. या अहवालानुसार सध्याच्या घडीला विराटने ९०० कोटी रुपयांची आतापर्यंत कमाई केली आहे, तर दुसरीकडे अनुष्काने आतापर्यंत ३५० कोटी रुपये कमावले आहेत. या दोघांकडे मिळून एकत्र १२५० कोटी रुपये आहेत. गेल्या वर्षी विराटला क्रिकेट सामने, जाहिराती आणि आयपीएलने भरघोस कमाई करून दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

विराट हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून खेळतो. गेल्या वर्षी या संघाने विराटला १७ कोटी रुपये दिले होते. गेल्या वर्षी विराटने एकूण २५२.७२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे फोर्ब्सच्या यादीमध्ये तो अव्वल स्थानावर होता. अनुष्काने गेल्या वर्षात एकूण २८.६७ कोटी रुपयांची कमाई केल्याचे पाहायला मिळाले आहे.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माआयपीएलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरफोर्ब्स