Join us

... अशी बोलिंग अॅक्शन तुम्ही पाहिलीच नसेल, व्हीडीओ झाला वायरल

या व्हिडीओमध्ये एक फिरकीपटू चक्क 360 डीग्रीमध्ये फिरून गोलंदाजी करताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 16:00 IST

Open in App
ठळक मुद्देबीसीसीआयनेदेखील या व्हिडीओची दखल घेतली आहे.

मुंबई : काही वेळा आपण विचित्र बोलिंग अॅक्शन पाहतो. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू पॉल अॅडम्सची बोलिंग अॅक्शन अजूनही आपल्या लक्षात राहते. सध्याच्या घडीला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची बोलिंग अॅक्शनही लोकांना आवडते. पण सध्या एका बोलिंग अॅक्शनचा व्हीडिओ चांगलाच वायरल झाला आहे. बीसीसीआयनेदेखील या व्हिडीओची दखल घेतली आहे.

या व्हिडीओमध्ये एक फिरकीपटू चक्क 360 डीग्रीमध्ये फिरून गोलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे त्याची ही बोलिंग अॅक्शन पाहाताना सर्वांनाच धक्का बसला. पण पंचांनी मात्र डेड बॉल असल्याचे घोषित केले. त्यामुळे या गोलंदाजासह क्षेत्ररक्षकांनाही धक्का बसला.

पाहा व्हीडीओ

टॅग्स :बीसीसीआय