Join us
Daily Top 2Weekly Top 5

या खेळाडूमुळं जिंकलो अन्यथा पराभव झाला असता, रोहित शर्माने केला खुलासा

या सामन्या कर्णधार रोहित शर्माने 89 धावांची धडाकेबाज खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 12:58 IST

Open in App

कोलंबो - काल झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 17 धावांनी पराभव केला. या सामन्या कर्णधार रोहित शर्माने 89 धावांची धडाकेबाज खेळी केली. विजयात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या रोहित शर्माने सामन्यानंतर बोलताना वॉशिंगटन सुंदरवर स्तुतीसुमने उधळली.  

भारताने दिललेल्या 177 धावांच्या आव्हाना पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा संघ 19.2 षटकांत 159 धावांपर्यंत मजल मारु शकला. बांगलादेशला विजयापासून रोखण्यात युवा गोलंदाज वॉशिंगटन सुंदरने महत्वाटची भूमिका बजावली. पॉवर प्लेमध्ये कंजूस गोलंदाजी करताना वॉशिंगटन सुंदरने तीन विकेट घेतल्या. वॉशिंगटन सुंदरच्या या स्पेलचे कौतुक करताना रोहित शर्मा म्हणाला की, सुंदरने विजयात महत्वाची भूमिका निभावली अन्यथा आमचा पराभव झाला असता. वॉशिंगटन सुंदरच्या चार षटकाच्या स्पेलमुळं सामन्याचे चित्र बदलले. सामन्यापूर्वी केलेल्या रणनितीनुसार सर्व गोलंदाजांनी गोलंदाजी केली. त्यामुळं ठराविक टप्यावर बांगलादेशच्या विकेट पडल्या. वॉशिंगटन सुंदर चेंडू फ्लाइट टाकताना घाबरत नव्हता. क्षेत्ररक्षण स्वत लावले आणि त्याप्रमाणे तो अचूक टप्यावर गोलंदाजी करत होता. त्याच्या या स्पेलमुळं आम्हाला सहज विजय मिळवता आला.

भारताची गोलंदाजी : मोहम्मद सिराज ४-०-५०-१; वॉशिंग्टन सुंदर ४-०-२२-३; शार्दुल ठाकूर ४-०-३७-१; युझवेंद्र चहल ४-०-२१-१; विजय शंकर 

कर्णधार रोहित शर्माचे (८९) आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर युवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (३/२२) याने घेतलेली फिरकी याजोरावर भारताने टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारताना बांगलादेशचा १७ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. मुशफिकुर रहिमने (७२*) पुन्हा एकदा शानदार अर्धशतक झळकावले, परंतु संघाला विजयी करण्यात तो अपयशी ठरला. रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. 

रोहित शर्माचा नवा रेकॉर्ड, युवराज सिंगलाही टाकलं मागे 

टी-20मध्ये युवराज सिंगचा 74 सिक्सर्सचा रेकॉर्ड तोडणार रोहित शर्मा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. निदाहास ट्रॉफी टी-20मध्ये बांग्लादेशविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात पूर्ण 20 ओव्हरपर्यंत रोहित मैदानात होता. याआधी हा रेकॉर्ड गौतम गंभीरच्या नावे होता. 2012मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-20 सामन्यात गौतम गंभीर 19.4 ओव्हरपर्यंत मैदानात होता. रोहित शर्माने 89 धावांच्या खेळीमध्ये पाचवा सिक्स लगावत युवराज सिंगचा 74 सिक्सर्सचा रेकॉर्ड तोडला.  सगळ्यात जास्त सिक्सर्स लगावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित आता पहिल्या क्रमाकांवर आहे. रोहितने एकुण 75 सिक्सर्स लगावले आहेत. त्यानंतर युवराज सिंग (74), सुरेश रैना (54), धोनी (46) आणि विराट कोहली (41) चा नंबर लागतो. एका वर्षात सर्वात जास्त सिक्सर्स लगावण्याचा रेकॉर्डही रोहित शर्माच्या नावे आहे. रोहित शर्माने 2017मध्ये तिन्ही प्रकारच्या सामन्यात 65 सिक्सर्स लगावण्याचा रेकॉर्ड केला होता. त्यावेळी त्याने क्रिस गेलचा 64 सिक्सर्सचा रेकॉर्ड तोडला.  

टॅग्स :निदाहास ट्रॉफी २०१८रोहित शर्मा