Join us  

IPL 2021 : क्रिकेटपटू झाला नसता तर सीरियात ISISचा अतिरेकी झाला असता, CSKच्या खेळाडूबाबत तस्लीमा नसरीनचं वादग्रस्त विधान 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी वादाची मालिका सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 5:05 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी वादाची मालिका सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. बांगलादेशची प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन ( taslima nasreen) यांनी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) याच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. आपल्या लेखणीमुळे प्रसिद्ध असलेल्या नसरीन यांना मुस्लिम समुदायांकडून जीवे मारण्याची धमकी अनेकदा दिली गेली आहे आणि त्यामुळे त्यांना देश सोडावा लागला आहे. आता त्या स्वीडनमध्ये स्थायिक आहेत. IPL 2021साठी पाच खेळाडूंनी दाखवला पाकिस्तानला 'ठेंगा'; मालिका मध्येच सोडून भारतात दाखल!

तस्लीमा नसरीन पुन्हा चर्चेत आल्या त्या त्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे. त्यांनी ट्विट केले की,'' मोईन अली क्रिकेट खेळत नसता तर तो सीरियात जाऊन ISISचा आतंकवादी झाला असता.''  IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या संघात कोरोना व्हायरसचा शिरकाव, प्रमुख सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

नेटिझन्सकडून समाचार...

मोईन अलीनं विनंती केली अन् CSKनं जर्सीवरून हटवला 'तो' लोगोमद्यपान करणे आणि मद्यप्रसारास प्रोत्साहन देणे इस्लामविरोधी मानले जाते. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली मुस्लीम आहे. तो आगामी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणार असून या संघाच्या जर्सीवर मद्याची जाहिरात करण्यात आल्यामुळे मोईनने जर्सी घालण्यास नकार दिला. सीएसके संघानेदेखील त्याची मागणी मान्य करीत लोगो पुसून टाकण्याचा निर्णय घेतला. मोईन हा इंग्लंडमधील क्लबसाठी खेळताना देखील या गोष्टीची खबरदारी बाळगतो. IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवरील सामने दुसरीकडे हलवा; स्थानिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र 

सीएसके संघात द. आफ्रिकेचे इम्रान ताहिर आणि के. एम. आसिफ यांचादेखील समावेश आहे. ताहिरने यापूर्वीदेखील मद्याची जाहिरात असलेली जर्सी घालण्यास नकार दिला होता. त्याची विनंतीही मान्य करण्यात आली होती. २०१९चा विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाने शॅम्पेन फोडून विजयोत्सव साजरा केला, त्यावेळीदेखील मोईन आणि सहकारी आदिल राशिद यांनी यापासून स्वत:ला दूर ठेवले होते. मागच्या सत्रात आरसीबीसाठी खेळतानादेखील मोईनने मद्य कंपनीचा लोगो असलेली जर्सी  घालण्यास नकार दिला होता. 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सइसिस