पाकिस्तानी क्रिकेटपटू हे नेहमी त्यांच्या इंग्रजीवरुन चर्चेत असतात... अनेक माजी खेळाडूंनी बाबर आजम अँड टीमला त्यांच्या इंग्रजीत सुधारणा करण्याचा सल्लाही दिला. पण, आता याच इंग्रजीवरून पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने अजब लॉजिक लावले आहे. पाकिस्तानी खेळाडू हसन अली याच्यापासून या वादाला सुरूवात झाली. हसन अलीने केलेले ट्विट लोकांना आवडले नाही आणि त्यांनी पाकिस्तानी गोलंदाजाल ट्रोल करण्यास सुरूवात केली. शादाब खानच्या ( Shadab Khan) ट्विटवर हसन अलीने कमेंट केली आणि तो ट्रोल झाला. त्यांतर शादाब मदतीला उतरला अन् त्याने थेट लिओनेल मेस्सीला मध्ये ओढले.
२४ वर्षीय शादाबने स्वतःचे काही स्टायलिस्ट फोटो पोस्ट केले आणि त्यावर त्याने लिहिले की मॉडलिंग स्कील चांगले? माझ्या सहकाऱ्यांकडून मी हे शिकतोय. त्याच्या या ट्विटवर हसन अलीने कमेंट केली आणि त्याने लिहिले की, मै सदकी जाऊ, वारी जाऊ अपने यार पर... मा शा अल्लाह नजर ना लग जाए...
हसन अलीने हिंदीत केलेल्या ट्विटवर नेटिझन्सने त्याला ट्रोल केले. काहींनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला टॅग करून खेळाडूंना इंग्रजी शिकवण्याचा सल्ला दिला. पण, शादाबला हे नाही आवडले अन् त्याने पुन्हा ट्विट करून नेटिझन्सवर टीका केली. त्याने यात म्हटले की,
लिओनेल मेस्सी पण इंग्रजी बोलत नाही, पण ते चालतं. परदेशी खेळाडूंनी असं केलं तर ते ठिक. पण, आम्ही आमच्या भाषेत बोलता कामा नये. फेक पर्सनालिटी म्हणून बनावं. मला माझ्या संस्कृतीचा अभिमान आहे.