"त्याने २० किलो वजन घटवलं, तर त्याला CSK मध्ये घेईन,"MS Dhoniचा अफगाणी खेळाडूला सल्ला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या तयारीला वेग पकडला आहे... १९ डिसेंबरला दुबईत यासाठी लिलाव पार पडणार आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 01:12 PM2023-12-08T13:12:24+5:302023-12-08T13:12:44+5:30

whatsapp join usJoin us
‘If he loses 20 kg, I will pick him in IPL’: MS Dhoni’s hilarious take on Afghanistan wicket-keeper batsman Mohammad Shahzad   | "त्याने २० किलो वजन घटवलं, तर त्याला CSK मध्ये घेईन,"MS Dhoniचा अफगाणी खेळाडूला सल्ला

"त्याने २० किलो वजन घटवलं, तर त्याला CSK मध्ये घेईन,"MS Dhoniचा अफगाणी खेळाडूला सल्ला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या तयारीला वेग पकडला आहे... १९ डिसेंबरला दुबईत यासाठी लिलाव पार पडणार आहे... हजारून अधिक खेळाडूंनी लिलावासाठी आपली नावं नोंदवली आहे. चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्स ( १६.२ कोटी) , ड्वेन प्रेटोरियस( ५० लाख) , कायले जेमिन्सन ( १ कोटी), आकाश सिंग ( २० लाख), अंबाती रायुडू ( ६.७ कोटी), सिसांडा मगाला( ५० लाख) , भगत वर्मा ( ३० लाख) व शुभ्रांशू सेनापती ( २० लाख) यांना खेळाडूंना रिलीज केले. चेन्नई सुपर किंग्सकडे आता ३१.४ कोटी रुपये शिल्लक आहेत आणि त्यांना ६ खेळाडू ( ३ परदेशी) आपल्या ताफ्यात दाखल करून घ्यायचे आहेत. त्यामुळे MS Dhoni कोणाला घेईल याची उत्सुकता आहे. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीचा एक जूना किस्सा समोर आला आहे. ज्यात त्याने अफगाणिस्ताच्या एका भारदस्त खेळाडूसमोर संघात घेण्यासाठी एक अट ठेवली होती...


अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद शहजाद ( Mohammad Shahzad ) हा त्याच्या स्फोटक खेळीसोबतच वजनदार व्यक्तिमत्वामुळेही ओळखला जातो. ३६ वर्षीय शहजादने ८४ वन डे सामन्यांत ३३च्या सरासरीने २७२७ धावा केल्या आहेत आणि त्यात ६ शतकांचा समावेश आहे. तेच ट्वेंटी-२०त त्याने ७३ सामन्यांत जवळपास ३०च्या सरासरीने २०४८ धावा केल्या आहेत. पण, त्याच्या वजनाची चर्चा अधिक रंगली आहे. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असघर अफघान याने महेंद्रसिंग धोनी आणि शहजाद यांच्यातला एक किस्सा सांगितला. 


टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत असघरने सांगितले की, २०१८मध्ये आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवल्यानंतर महेंद्रसिंग धोनीसोबत गप्पा रंगल्या. तो एक उत्तम कर्णधार आहे आणि भारतीय क्रिकेटला देवाने दिलेलं हे गिफ्ट आहे. मी तेव्हा धोनी भाईला सांगितले की, शहजाद तुमचा खूप मोठा फॅन आहे. तेव्हा धोनी म्हणालेला शहजादचं पोट खूप सुटलेलं आहे आणि त्याने जर २० किलो वजन कमी केलं तर मी त्याला आयपीएलमध्ये आमच्या संघात निवडेन. पण, त्या मालिकेनंतर शहजाद अफगाणिस्तानला परतला आणि ५ किलो वजन आणखी वाढवले.   


चेन्नई सुपर किंग्सने कायम राखलेले खेळाडू ( CSK Retained players list) - महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराणा, समिरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, महीष थीक्षणा, अजिंक्य रहाणे,  शेख राशीद, निशांत सिंधू, अजय मंडल 
 

Web Title: ‘If he loses 20 kg, I will pick him in IPL’: MS Dhoni’s hilarious take on Afghanistan wicket-keeper batsman Mohammad Shahzad  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.