Join us  

ICCAwards : विराट कोहली ठरला वन डे क्रिकेटमधील दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

भारताचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याची रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (ICC) दशकातील वन डे आणि ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे विराट कोहली ( Virat Kohli) याला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले.  

By स्वदेश घाणेकर | Published: December 28, 2020 2:12 PM

Open in App

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) दशकातील सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटूचा मान पटकावला. मागील दहा वर्षांत त्यानं वन डे क्रिकेटमध्ये १० हजाराहून अधिक धावा, ३९ शतकं व ४८ अर्धशतक झळकावली. शिवाय ११२  झेल टिपले. ''संघाच्या विजयात हातभार लावणे, हेच माझे ध्येय आहे. प्रत्येक सामन्यात ते गाठण्याचा मी प्रयत्न करतो,'' अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.  

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा मान पटकावला. त्यानं या दहा वर्षांत ६५.७९च्या सरासरीनं ७०४० धावा केल्या आणि त्यात २६ शतकं व २८ अर्धशतकांचा समावेश होता.  

दरम्यान , भारताचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याची रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (ICC) दशकातील वन डे आणि ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे विराट कोहली ( Virat Kohli) याला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले.  

वन डे आंतरराष्ट्रीय संघात तीन व ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय संघात चार भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले. कसोटी संघात इंग्लंडच्या सर्वाधिक चार खेळाडूंना स्थान मिळाले. याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा धोनी दशकातील सर्वोत्तम वन डे संघात स्थान मिळवणाऱ्या तीन भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. संघात रोहित शर्मा आणि भारताचा विद्यमान कर्णधार कोहलीलादेखील स्थान मिळाले आहे. ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात धोनीशिवाय रोहित, कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आला आहे. 

दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ - अॅलेस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, विराट कोहली ( कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, आर अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन

दशकातील सर्वोत्तम वन डे संघ - रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शकिब अल हसन, महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहीर, लसिथ मलिंगा. 

दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघ -  रोहित शर्मा, अॅरोन फिंच, ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार), किरॉन पोलार्ड, राशीद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम महिलांचा वन डे संघ- अॅलिसा हिली, सुझी बॅट्स, मिताली राज, मेग लॅनिंग ( कर्णधार), स्टेफनी टेलर, साराह टेलर, एलिसे पेरी, डेन व्हॅन निएकर्क, मेरीझॅपे कॅप्प, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद

दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघ महिला - अॅलिसा हिली, सोफी डेव्हिन, सुझी बॅट्स, मेग लॅनिंग ( कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्टेफनी टेलर, डेंड्रा डॉटिन, एलिसा पेरी, अॅन श्रुबसोल, मीगन स्कट, पूनम यादव 

टॅग्स :आयसीसीविराट कोहली