Join us  

ICCAwards: हिटमॅन रोहित शर्माचा धुरळा, आयसीसीकडून मोठा पुरस्कार जाहीर 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) 2019च्या वर्षाच्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:30 AM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) 2019च्या वर्षाच्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. या पुरस्कारात भारताच्या दीपक चहरने एक विशेष पुरस्कार पटकावला. शिवाय विराट कोहलीच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील एका कृतीचंही पुरस्कारानं कौतुक करण्यात आलं. 2019मधील वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार टीम इंडियाचा हिटमॅन रोहीत शर्मानं पटकावला.

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेननं 2019च्या सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जिंकला. लाबुशेननं 2019मध्ये कसोटीत पदार्पण केले आणि त्यानं 11 कसोटी सामन्यांत 64.94च्या सरासरीनं 1104 धावा केल्या.

भारताच्या दीपक चहरनं 2019मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार पटकावला. त्यानं बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात हॅटट्रिकसह 7 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या. 

चहरनं कोणता विक्रम मोडला होता...ट्वेंटी-20त हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीयश्रीलंकेच्या अजंथा मेडिंसचा 8 धावांत 6 विकेट घेण्याचा विक्रम मोडला6/7 - दीपक चहर वि. बांगलादेश, 20196/8 - अजंथा मेंडिस वि. झिम्बाब्वे, 20126/16- अजंथा मेंडिस वि. ऑस्ट्रेलिया, 20116/25 - युजवेंद्र चहल वि. इंग्लंड, 2017

स्कॉटलंडच्या कायले कोएत्झर यानं संलग्न संघटनांमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्यानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा आणि वन डे क्रिकेटमध्ये 48.88च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यना स्टीव्ह स्मिथवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांना सज्जड दम भरला होता. त्याच्या या कृतीला सर्वाधिक पसंती मिळाली होती आणि आयसीसीनं या कृतीला स्पिरीट ऑफ क्रिकेट या पुरस्कारानं गौरविले. रोहितनं यंदाच्या वर्षात वर्ल्ड कप स्पर्धेतील 5 शतकांसह एकूण 7 शतकी खेळी केल्या. त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 2019मध्ये 28 सामन्यांत 57.30च्या सरासरीनं 1490 धावा केल्या. 

टॅग्स :आयसीसीरोहित शर्मा