Join us  

ICC World Twenty20: चर्चा होणारच; लेडी जाँटी ऱ्होड्सचा अप्रतिम कॅच, पाहा व्हिडीओ

ICC World Twenty20: ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण करणारी टायला व्हॅलमनिक भाव खाऊन गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 11:35 AM

Open in App
ठळक मुद्देभारतीय महिला संघाचा विजयाचा चौकारस्मृती मानधनाची 83 धावांची वादळी खेळी ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण करणारी टायला व्हॅलमनिक भाव खाऊन गेली

गयाना : स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत 'B' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा चांगलाच समाचार घेतला. स्मृतीची ८३ धावांची खेळी डोळ्यांची पारणं फेडणारी ठरली. पण, या सान्यातून ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण करणारी टायला व्हॅलमनिक भाव खाऊन गेली. तिने टिपलेला अप्रतिम झेल दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सची आठवण करून देणारा ठरला. 

स्मृती आणि कर्णधार हरमनप्रीत यांची तिस विकेटसाठीची अर्धशतकी भागीदारी संपुष्टात आल्यानंतर वेदा कृष्णमूर्ती फलंदाजीला आली. झटपट खेळी करून भारताला मोठा पल्ला गाठून देण्याच्या निर्धारानेच ती आली होती. पण १६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तिला माघारी परतावे लागले. ए . गार्डनरच्या संथ गतीच्या चेंडूवर वेदाने फटका मारला.  मात्र स्वेअर लेगला उभी असलेली व्हॅलमनिक चेंडूचा अंदाज बांधत हवेत झेपावली. तिने एका हाताने तो झेल टिपला.. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही काही काळ यावर विश्वास बसला नाही. व्हॅलमनिकच्या या कॅचनंतर  सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील ही सर्वोत्तम कॅच असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. भारताच्या राधा यादवने घेतलेल्या कॅचचीही दिवसभर चर्चा होती.ॲलिसा हिली जखमी, ऑस्ट्रेलियाची चिंता वाढलीभारतीय फलंदाजाचा झेल टिपताना समन्वय साधता न आल्यामुळे यष्टिरक्षक ॲलिसा हिली आणि गोलंदाज मेगन स्कट यांच्यात टक्कर झाली. त्यात स्कटचा खांदा हिलीच्या चेहऱ्यावर आदळला आणि तिला मैदान सोडावे लागले. नेहमी सलामीला येणारी हिली पाचव्या विकेटपर्यंत फलंदाजीला न आल्याने कांगारूंची चिंता वाढली. तिची जखम गंभीर असून ती उर्वरित सामन्यांना मुकणार आहे.

टॅग्स :आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारतीय महिला क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया