Join us  

ICC World Test Championship : कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाआधीच टीम इंडियाला बसला धक्का; झाले मोठे नुकसान

ICC World Test Championship Point Table : कानपूर कसोटीचा पहिला दिवस पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं गाजवला. शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांच्याही अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद २५८ धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 9:41 AM

Open in App

ICC World Test Championship Point Table : कानपूर कसोटीचा पहिला दिवस पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं गाजवला. शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांच्याही अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद २५८ धावा केल्या. आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात श्रेयसच्या शतकाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पण, त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (  ICC World Test Championship) भारताची ही दुसरी मालिका आहे आणि या कसोटीआधी भारतीय संघानं चार सामन्यांत दोन विजय व एक ड्रॉ निकालासह २६ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. भारताच्या खात्यात २६ गुण आहेत. त्यानंतर  पाकिस्तान व वेस्ट इंडिज प्रत्येकी १२ गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या तर इंग्लंड १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचे गुणांची टक्केवारी ५४.१७ अशी आहे. पाकिस्तान-वेस्ट इंडिजची टक्केवारी ५०-५० अशी आहे, तर इंग्लंडची टक्केवारी ही २९.१७ अशी आहे.

श्रीलंकेनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्याच  कसोटीत वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवून सर्वांना धक्का दिला आहे. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी सामन्यात १८ गडी बाद केल्यामुळे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजला पहिल्या सामन्यात पाचव्या आणि अखेरच्या दिवशी १८७ धावांनी पराभवाचे तोंड पहावे लागले.  दोन्ही डावांत फलंदाजीत शानदार कामगिरी करणारा यजमान कर्णधार दिमुथ करुणारत्ने सामन्याचा मानकरी ठरला. लंकेने विंडीजला विजयासाठी ३४८ धावांचे लक्ष्य दिले होते. विंडीजचा दुसरा डाव १६० धावांत संपुष्टात आला.  लंकेने पहिल्या डावात ३८६ धावा उभारल्या होत्या. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात केवळ २३० धावा केल्या.  

श्रीलंकेनं या विजयासह खात्यात १२ गुण जमा केले आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. भारतापेक्षा श्रीलंकेचे गुण कमी असले तरी त्यांची विजयाची टक्केवारी ही १०० टक्के असल्यानं त्यांना हे अव्वल स्थान मिळाले.

आयसीसीनं गुणपद्धतीत केलाय बदल प्रत्येक संघाला समान कसोटी सामने मिळणार नसल्याने गुणतालिकेतील तफावत टाळण्यासाठी आयसीसीने प्रत्येक सामन्याला समान गुण दिले. त्यानुसार प्रत्येक विजयासाठी १२ तर टायसाठी समान ६-६ गुण असतील. सामना अनिर्णीत राहिल्यास ४-४ गुण असतील. गुणांसोबतच टक्केवारीही निश्चित करण्यात आली. त्यानुसार १२ गुणांना शंभर टक्के, सहा गुणांना ५० टक्के आणि चार गुणांना ३३.३३ टक्के दिले जातील. दोन सामन्यांच्या मालिकेत २४, तीन सामन्यांच्या मालिकेत ३६, चार सामन्यांच्या मालिकेसाठी ४८ तसेच पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ६० गुण असणार आहेत.  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंडश्रीलंकावेस्ट इंडिज
Open in App